Bilkis Bano case | SC Dainik Gomantak
देश

Bilkis Bano case: 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर सुटका कशी झाली? SC ने गुजरात सरकारवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

उर्वरित कैद्यांना 14 वर्षांच्या कारावासानंतरही सुटका का मिळाली नाही, असा सवाल न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bilkis Bano case: बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. या दोषींना फाशीच्या शिक्षेनंतर जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. मग 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्यांची सुटका कशी झाली? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.

उर्वरित कैद्यांना 14 वर्षांच्या कारावासानंतरही सुटका का मिळाली नाही, असा सवाल न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे.

2002 मध्ये गोध्रा दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 11 जण दोषी आढळले होते.

देशातील तुरुंग कैद्यांनी भरलेली आहेत, मग त्यांना सुधारण्याची संधी का दिली जात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बिल्कीसच्या दोषींसाठी तुरुंग सल्लागार समिती कशाच्या आधारावर स्थापन करण्यात आली? असा सवाल देखील सुप्रीम कोर्टाने उपस्थित करत, सल्लागार समितीचा तपशील मागितला.

बिल्किस बानोच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी आता 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.

गुजरात सरकारच्या समितीच्या अहवालानंतर, 15 ऑगस्ट 2022 रोजी, बिल्किस बानो प्रकरणातील सर्व दोषींना मुदतीपूर्वी सोडण्यात आले. दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षी गुजरात सरकारने शिक्षा माफीच्या धोरणाखाली त्यांची सुटका केली. सुटका झालेल्यांपैकी काहींनी 15 वर्षे तर काहींनी 18 वर्षे तुरुंगात घालवली आहेत.

सर्व दोषींना वेळेपूर्वी सोडण्याच्या निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. अन्यायकारक निर्णय म्हणत बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारच्या या निर्णयावर टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT