BJP MP Janardan Singh Sigriwal Dainik Gomantak
देश

BJP MP Janardan Singh Sigriwal: 'मला तर सोडा, मी खासदार आहे...', बिहार पोलिसांची मुजोरगिरी; थेट भाजप नेत्याला मारहाण

Bihar Police Lathi Charge On BJP Leader: पावसाळ्यासोबतच बिहारमध्ये पोलिसांच्या लाठ्याही बरसत आहेत.

Manish Jadhav

Bihar Police Lathi Charge On BJP Leader: पावसाळ्यासोबतच बिहारमध्ये पोलिसांच्या लाठ्याही बरसत आहेत. बुधवारी जिथे पोलिसांनी शेतकरी सल्लागारांचा पाठलाग करुन त्यांना मारहाण केली, तिथे गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.

बिहार पोलिसांनी सर्वांवर लाठीचार्ज केला, मग तो विरोधी पक्षनेता असो वा भाजप खासदार. महाराजगंजचे भाजप खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला तेव्हा ते म्हणाले की, ''मला सोडा, मी खासदार आहे.'

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जनार्दन सिंह सिग्रीवाल गंभीर जखमी झाले. मीडियासमोर आल्यानंतर त्यांनी सांगितले की, कदाचित आपला हातही फ्रॅक्चर झाला आहे. यासोबतच त्यांचे अंगरक्षकही जखमी झाले.

भाजप खासदार सिग्रीवाल हे त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचारी आणि समर्थकांमुळे पोलिसांपासून (Police) कसेबसे बचावले. यादरम्यान मारो मारोचा आवाजही येत होता. भाजप खासदार सिग्रीवाल यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

लाठीचार्जचा बदला जनता घेणार

भाजप नेते सिग्रीवाल म्हणाले की, आम्ही शेतकरी आणि बिहारच्या तरुणांचा आवाज उठवत होतो. मात्र महाआघाडी सरकारने ते दडपण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, भाजप नेत्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, आम्ही शांततेत विधानसभेवर मोर्चा काढत आहोत. यानंतरही आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. शेकडो शेतकरी जखमी झाले. ही कसली लोकशाही आहे नितीश कुमारांची.' पुढील निवडणुकीत जनता लाठीचार्जचा बदला घेईल, असेही भाजप नेते म्हणाले.

दुसरीकडे, भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन म्हणाले की, हा अन्याय आहे. लोकशाहीची ही हत्या आहे. बिहारमध्ये आणीबाणी लागू झाली आहे, नितीश कुमार (Nitish Kumar) यांची हुकूमशाही चालणार नाही.

भाजप अध्यक्षांनीही ट्विट करत निशाणा साधला

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करुन पाटण्यात विधानसभेच्या मोर्चादरम्यान भाजप नेत्यावर झालेल्या लाठीचार्जवर निशाणा साधला आहे.

जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ट्विट केले आहे की, ज्या व्यक्तीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, त्याला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नैतिकता विसरले आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि रोषाचा परिणाम आहे.

जहानाबादमध्ये भाजप नेत्याचे निधन

बुधवारी पाटण्यात भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांवर झालेल्या लाठीचार्जमध्ये जहानाबादच्या एका नेत्याचा मृत्यू झाला आहे. विजय कुमार सिंह असे मृत नेत्याचे नाव आहे. ते जहानाबाद भाजपचे सरचिटणीस होते.

डाक बंगल्यावर झालेल्या लाठीचार्ज आणि चेंगराचेंगरीत भाजप नेते कोसळले होते, त्यानंतर त्यांना पीएमसीएचमध्ये नेण्यात आले होते. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भाजप नेत्याच्या मृत्यूनंतर पाटणा जिल्हा प्रशासनाने लाठीचार्जमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा इन्कार केला आहे. भाजप नेत्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचे पाटणा पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Live News: क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

SCROLL FOR NEXT