Nitish Kumar: बिहारमध्ये नवी आघाडी आकार घेत असून एनडीएमध्ये फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. जेडीयूची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होत आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. राज्यपालांच्या वतीने नितीश कुमार (Nitish Kumar) यांना साडे बारा वाजता भेटण्याची वेळ देण्यात आली आहे. त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज राबरी निवासस्थानी सुरु असलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली आहे. सूत्रांनी असेही सांगितले की, नितीश कुमार यांच्यासोबत तेजस्वी यादवही (Tejashwi Yadav) राज्यपालांना भेटायला जाऊ शकतात.
दुसरीकडे, आरजेडी कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तेजस्वी यादव यांनी राजदच्या सर्व आमदारांना पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करुन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तेजस्वी यादव नितीश कुमार यांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, युती तुटण्यापूर्वी भाजपचे मंत्री राजीनामे देऊ शकतात, अशीही बातमी समोर येत आहे.
तत्पूर्वी, पाटण्यात भाजपने (BJP) आपल्या विविध आघाड्यांची संयुक्त कार्यकारिणीची बैठक घेतली. विधानसभेच्या 200 जागांसाठी रोडमॅप तयार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल जेडीयूने 243 जागांसाठी आपली तयारी असल्याचे सांगितले.
शिवाय, बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) वेळी आणि निकालानंतर लगेचच नितीश कुमार काहीसे नाराज झालेले दिसले. संयुक्त राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 200 विधानसभा जागांसाठी रोडमॅप तयार करण्यासाठी पार पडली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.