Patna High Court Dainik Gomantak
देश

Patna High Court: 'कर्ज परतफेडीसाठी जबरदस्तीने वाहन जप्ती चुकीची,' हायकोर्टाचा निर्वाळा

Patna High Court: कर्जाची परतफेड न करणाऱ्या मालकांकडून जबरदस्तीने वाहन जप्त करणे चुकीचे असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Manish Jadhav

Patna High Court: कर्जाची परतफेड न करणाऱ्या मालकांकडून जबरदस्तीने वाहन जप्त करणे चुकीचे असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

घटनेने दिलेल्या जगण्याच्या आणि उपजीविकेच्या मूलभूत अधिकाराचे हे उल्लंघन आहे.

अशा धमक्या देणार्‍या कृत्यांवर एफआयआर नोंदवावा. सिक्युरिटायझेशनच्या तरतुदींचे पालन करुन वाहन कर्ज वसूल करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

यासाठी ग्राहकांच्या सुरक्षेच्या हिताची काळजी करा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान, रिट याचिकांवर निकाल देताना न्यायमूर्ती राजीव रंजन प्रसाद यांच्या एकल खंडपीठाने बँका आणि वित्त कंपन्यांना फटकारले.

न्यायालयाने बिहारच्या (Bihar) सर्व पोलिस अधीक्षकांना हे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले की, कोणत्याही वसुली एजंटकडून कोणतेही वाहन जबरदस्तीने जप्त केले जाणार नाही.

जबरदस्तीने वाहन जप्तीबाबत पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय

वसुली एजंटांकडून जबरदस्तीने वाहने जप्त करण्याच्या पाच प्रकरणांवर सुनावणी करताना न्यायालयाने 19 मे रोजी हा आदेश दिला.

थकबाकीदार बँका/वित्तीय कंपन्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आपल्या 53 पानांच्या निकालात न्यायमूर्ती रंजन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) 25 हून अधिक निकालांचा संदर्भ दिला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला होता.

न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, उच्च न्यायालय कोणत्याही 'खाजगी कंपनी' विरुद्ध रिट याचिका स्वीकारु शकते, ज्यांच्या कृतीमुळे एखाद्या नागरिकाचा जीवन जगण्याचा आणि उपजीविकेचा मूलभूत हक्क हिरावला जातो, ज्याची संकल्पना घटनेच्या कलम 21 नुसार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

SCROLL FOR NEXT