Crime News  Dainik Gomantak
देश

Bihar Crime: धक्कादायक! प्रियकराने आधी प्रेयसीला दारु पाजली, नंतर तिच्या मुलांची हत्या करुन...

Bihar Crime: बिहारमधील मधुबनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीच्या दोन मुलांची मान मुरडून हत्या केली.

Manish Jadhav

Bihar Crime: बिहारमधील मधुबनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीच्या दोन मुलांची मान मुरडून हत्या केली.

मुलांची हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह बालन नदीत फेकून दिले. ही धक्कादायक घटना घोघरडिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किसनिपट्टी निर्मली लिंक रोडची आहे.

आरोपी निष्पाप मुलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना लोकांनी त्याला पकडले आणि एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला. निरपराधांच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली.

दरम्यान, कोणीतरी पोलिसांना (Police) माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. यासोबतच पोलिसांनी एका मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

या घटनेबाबत सांगितले जात आहे की, आरोपी आपल्या प्रेयसीसोबत कारने नदीच्या काठावर पोहोचला. त्यानंतर दोघांनीही तिथेच नशा केली. त्याने प्रेयसीला दारुच्या नशेत बेशुद्ध केले. यानंतर दोन्ही मुलांची नदीजवळ नेऊन निर्घृण हत्या करुन मृतदेह नदीत फेकून दिले.

आरोपी पळून जात होता...

यामुळे लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. दुसरीकडे, या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडवले आणि रुग्णालयात नेले.

आरोपी (Accused) येथून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. प्रमोद साफी याचा पाच वर्षांचा मुलगा प्रिन्स कुमार आणि दोन वर्षांची मुलगी सृष्टी कुमारी असे मृत मुलांची नावे आहेत, ते धरमठ पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी आहेत.

मुलांचा जीव घेतला

एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेबाबत सांगितले की, एक व्यक्ती, एक महिला आणि दोन मुले गाडीतून खाली उतरुन पुलाच्या शेजारी बसले होते. यानंतर त्याने आणि महिलेने नशा केली. त्यानंतर काही वेळाने ती महिला बेशुद्ध पडल्यावर त्या व्यक्तीने दोन्ही मुलांना घेऊन नदीच्या काठावर नेले.

त्यानंतर त्यांची हत्या करुन बालन नदीत फेकून दिले. जयप्रकाश मंडल असे मारेकऱ्याचे नाव असून तो लौखी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानुकी येथील रहिवासी आहे. जयप्रकाश याचे आधीच लग्न झालेले आहे.

त्याचवेळी, आंधरामठ पोलिस स्टेशन हद्दीतील नरी येथील रहिवासी प्रमोद साफी यांची पत्नी अनिता देवी असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. 10 वर्षापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. या प्रकरणी घोघरडिहा पोलिस स्टेशनचे प्रभारी सर्वेश कुमार झा यांनी सांगितले की, मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. आरोपी आणि त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

नोकरी सोडली, अयोध्येचे राम मंदिर बनवले; 108 ठिकाणी भ्रमंतीची केली भीष्मप्रतिज्ञा, तुमकूरमधील रामभक्ताची कहाणी

SCROLL FOR NEXT