CM Nitish Kumar Dainik Gomantak
देश

Bihar: मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोरोनाची लागण

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच या विषाणूच्या विळख्यात असलेल्या राजकारण्यांची संख्याही वाढत आहे. यातच आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री, तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी 5 जानेवारीला कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय राज्याचे दोन मंत्री सुनील कुमार आणि अशोक चौधरी यांनाही कोरोनाची लक्षणे आढळली होती.

दुसरीकडे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राजनाथ यांनी सोमवारी एका ट्विट करुन म्हटलं की, ‘’लक्षणे अतिशय सौम्य असली तरी मला आज कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चाचणी करुन स्वतःला वेगळे करावे.’’ विशेष म्हणजे, अलीकडेच अनेक राजकारणी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, ज्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूतील भाजप नेत्या खुशबू सुंदर, भाजप खासदार मनोज तिवारी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे आणि काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि दीपेंद्र हुडा यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayde Village: मयडेला शहर घोषित करण्यास विरोध, ग्रामसभेने प्रस्ताव फेटाळला; ग्रामीण अस्तित्व कायम ठेवण्याचा ठराव

...अन् आईने फोडला हंबरडा! अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी; तिघा मदार बंधूंवर शोकाकुल स्थितीत अंत्यविधी

आत्महत्या की घातपात? पाली येथील विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह, 2 दिवसांपासून होता बेपत्ता; वाळपई पोलिसांकडून तपास

खरी कुजबुज: सलमान, अझरुद्दीनचे विजयला मेसेज

पाण्यात उतरताना युवकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे, कुळे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT