स्पाइसजेटचे (SpiceJet) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) अजय सिंह (Ajay Singh) यांनी म्हटले आहे की, एअर इंडिया (Air India) चांगली होणे गरजेचे आहे. Dainik Gomantak
देश

Air India खरेदीबाबत स्पाइसजेटच्या संचालकांचे मोठे विधान

आमचा विश्वास आहे की एअर इंडिया एक चांगली विमान कंपनी असेल ज्याचे अधिग्रहण किंवा खाजगीकरण होईल आणि हळूहळू एअर इंडियाचा (Air India) तोच जुना ब्रँड पुन्हा परत येईल. भारतासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे

दैनिक गोमन्तक

स्पाइसजेटचे (SpiceJet) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) अजय सिंह (Ajay Singh) यांनी म्हटले आहे की, एअर इंडिया (Air India) चांगली होणे हे संपूर्ण देशासाठीच एका उत्तम गोष्ट आहे. सरकारच्या खाजगीकरणानंतर हा ब्रँड हळूहळू आपले जुने वैभव परत मिळवत आहे.

आपल्या वैयक्तिक क्षमतेनुसार एअर इंडियासाठी बोली लावली आहे का, असे सिंह यांना विचारल्यावर ते म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे की आमचा सरकारशी गोपनीयता करार आहे. त्यामुळे, मी एअर इंडियाच्या बोलीबद्दल काहीच बोलू शकत नाही.

पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंह आणि टाटा समूहाने कर्जबाजारी एअर इंडियासाठी ठेवलेल्या आर्थिक निविदा गेल्या महिन्यात उघडण्यात आल्या होत्या आणि 29 सप्टेंबर रोजी 'निर्गुंतवणुकीवरील मुख्य सचिवांच्या गटाने' मूल्यमापन केले. कॅबिनेट सचिव राजीव गौबा हे या गटाचे प्रमुख आहेत.

1 ऑक्टोबर रोजी, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (DIPAM) - खाजगीकरणासाठी जबाबदार सरकारी विभाग - यांनी ट्विटरवर लिहिले की केंद्राने अद्याप एअर इंडियासाठी आर्थिक बोली मंजूर केलेली नाही, जेव्हा होईल तेव्हा, माध्यमांना त्याबद्दल माहिती देण्यात येईल.

एअर इंडियाचा ब्रँड परत येईल

जेव्हा एका खासगी कंपनीने एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर भारतीय विमान वाहतूक बाजाराची स्थिती काय असेल असे त्यांना विचारले असता त्यांनी ते म्हणाले, कल्पनेवर आधारित आहे, परंतु अर्थातच एक एअर इंडियाला संपूर्ण देशासाठी चांगली सेवा देणारी कंपनी करायचे आहे. आमचा विश्वास आहे की एअर इंडिया एक चांगली विमान कंपनी असेल ज्याचे अधिग्रहण किंवा खाजगीकरण होईल आणि हळूहळू एअर इंडियाचा तोच जुना ब्रँड पुन्हा परत येईल. भारतासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे की आमच्याकडे अग्रगण्य विमान सेवा आहे जी जगभरात ओळखली जाते.

टाटाकडे 68 वर्षांनंतर असेल एअर इंडिया

एअर इंडियाच्या नवीन मालकाची घोषणा शुक्रवारी होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने टाटा ग्रुपची निवड केली आहे. जर सरकारने टाटाशी केलेला करार पक्का झाला तर 68 वर्षांनंतर एअर इंडियाची 'घर वापसी' होऊ शकेल.

या कराराअंतर्गत मुंबईतील एअर इंडियाचे मुख्य कार्यालय आणि दिल्लीच्या एअरलाईन्स हाऊसचाही समावेश आहे. मुंबई कार्यालयाचे बाजारमूल्य 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या, एअर इंडिया 4400 देशांतर्गत उड्डाणे आणि 1800 परदेशी लँडिंग आणि पार्किंग स्लॉट नियंत्रित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT