Gyanvapi Masjid
Gyanvapi Masjid Dainik Gomantak
देश

ज्ञानवापी प्रकरणावरील सुनावणीपूर्वी मोठी बातमी, हिंदू बाजूने केली ट्रस्ट स्थापनेची घोषणा

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) काशी विश्वनाथ मंदिर परिसरात असलेल्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरणात मंगळवारी न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी मोठी बातमी समोर आली आहे ती अशी की, हिंदू पक्षाने ज्ञानवापी मुद्द्यावर ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ट्रस्टला श्री आदि महादेव काशी धर्मालय मुक्ती न्यास असे नाव देण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज होणार आहे आणि या ट्रस्टकडे न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणाच पाहण्याची जबाबदारी असणार आहे. (Big news before the hearing on Gyanvapi case announcement of establishment of Kelly Trust by Hindu side)

या ट्रस्टचे उद्घाटन आज सायंकाळी 5 वाजता मालदहिया येथील एका खाजगी रेस्टॉरंटमध्ये चार फिर्यादी महिलांसह हिंदू बाजूच्या सर्व वकिलांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court of India) ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन आणि त्यांचे पुत्र विष्णू शंकर जैन आणि उच्च न्यायालयाच्या वकील रंजना अग्निहोत्री यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, हा एक छोटासा उद्घाटन सोहळा आहे, ज्यामध्ये 5 पाहुणे, 11 विश्वस्त, 21 आदरणीय विश्वस्त आणि 4 महिला सहभागी होणार आहेत. ट्रस्टमध्ये तेवढेच लोक राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर या ट्रस्टचे काम कोर्टात सुरू असलेले प्रकरण पाहण्याचे असणार आहे. एवढेच नाही तर खर्चापासून इतर सर्व जबाबदाऱ्या हे ट्रस्ट पाहणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात असलेल्या ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी मंगळवारी पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी होणार आहे सध्या या प्रकरणाची गुणवत्तेवर सुनावणी सुरू आहे तसेच मुस्लीम पक्ष आपली बाजू मांडत आहे. यानंतर हिंदू न्यायालयासमोर आपला दावा मांडणार आहे. यापूर्वी, हिंदू लोकांनी ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: गोव्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

SCROLL FOR NEXT