AIADMK: के पलानीस्वामी यांची हंगामी सरचिटणीस म्हणून निवड

AIADMK जनरल कौन्सिलच्या बैठकीमध्ये इडाप्पाडी के पलानीस्वामी यांची हंगामी सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे.
Edappadi K. Palaniswami
Edappadi K. PalaniswamiDainik Gomantak
Published on
Updated on

मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) राजकीय पक्षाच्या भांडणात हस्तक्षेप न करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत AIADMK नेते आणि माजी समन्वयक ओ. पनीरसेल्वम यांची (OPS) सर्वसाधारण परिषद सोमवारी बरखास्त करण्यात आली आहे. यानंतर पक्षाचे सरचिटणीस पद बहाल करण्याचा प्रस्ताव आणण्यासाठी AIADMK जनरल कौन्सिलच्या बैठकीमध्ये इडाप्पाडी के पलानीस्वामी (Edappadi K. Palaniswami) यांची हंगामी सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे. (AIADMK Election of K Palaniswami as Interim General Secretary)

Edappadi K. Palaniswami
दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; 700 हून अधिक लोकांचे स्थलांतर

अण्णाद्रमुकच्या सर्वसाधारण सभेत समन्वयक आणि संयुक्त समन्वयक पद रद्द करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला आहे. एआयएडीएमकेच्या जनरल कौन्सिलच्या बैठकीत पलानीस्वामी यांना पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे, त्यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आणि त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले आहे.

AIADMK जनरल कौन्सिलची बैठक आज 11 जुलै रोजी येथील एका मॅरेज हॉलमध्ये पार पडत आहे. न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांनी सोमवारी सकाळी दिलेल्या निकालात, तामिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या ईपीएस गटाला सर्वसाधारण परिषद बैठक घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

OPS आणि EPS च्या वरिष्ठ वकिलांचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी आज 8 जुलै रोजी निकाल राखून ठेवला होता तर सर्वसाधारण सभेला आव्हान देणारी दुसरी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कायद्यानुसार बैठक होऊ शकते, असे न्यायमूर्तींनी यावेळी सांगितले आहे.

बैठकीपूर्वी येथील AIADMK मुख्यालयाबाहेर पक्ष कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी देखील झाली तसेच याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. पलानीस्वामी यांच्या गटाचे नेते इडाप्पाडी यांच्या गटातील लोक त्यांना सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत त्यांचा नेता म्हणून निवडू शकतात तेव्हा ही घटना घडली आहे.

माजी समन्वयक ओ पनीरसेल्वम त्यांच्या समर्थकांसह पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. तर पलानीस्वामी जनरल कौन्सिलची बैठक सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. सकाळी दोन्ही गटांचे कथित समर्थक पक्षाचे झेंडे घेऊन आले आणि त्यांच्यात हाणामारी झाली आहे. टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या फोटोमध्ये काही लोक एकमेकांवर दगडफेक करताना आणि काही शेजारी उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान केले आहे.

Edappadi K. Palaniswami
शिंदे सरकारची मोठी परीक्षा! 16 आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

यादरम्यान काही जणांना दुखापतही झाली आहे. काही लोक जबरदस्तीने कार्यालयाचे दरवाजे उघडून आत जाताना दिसून आले आहे आणि त्यामुळे पक्ष कार्यालयात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर AIADMK जनरल कौन्सिलने सरचिटणीस पद पुनर्स्थापित करण्याचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यांद्वारे एका व्यक्तीची निवड सुनिश्चित करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे.

तसेच 4 महिन्यांनी निवडणूक होणार आहे. AIADMK जनरल कौन्सिलने पक्षाचे दुहेरी नेतृत्व संपुष्टात आणण्याचा आणि पक्षासाठी उपसरचिटणीस पद निर्माण करण्याचा ठरावही मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com