pratap singh bajwa

 

Twitter/ ANI

देश

Punjab Assembly Elections: काँग्रेसला मोठा धक्का, दोन आमदारांनी भाजपमध्ये केला प्रवेश

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly elections 2022) सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Punjab Assembly elections 2022) सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. त्यांचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रताप सिंग बाजवा (pratap singh bajwa) यांचे धाकटे बंधू फतेह जंगसिंग बाजवा आहेत. फतेह सिंग बाजवा हे कादियानचे आमदार आहेत. आता या मतदारसंघात दोन्ही भावांमध्ये निवडणूक लढत पाहायला मिळणार आहे. प्रताप बाजवा येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकत्याच झालेल्या रॅलीत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) यांनी फतेह बाजवा यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र, त्या घोषणेनंतर लगेचच प्रतापसिंह बाजवा यांनीही आपणही याच जागेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. सूत्रांकडून सांगण्यात आले की, आपल्या मोठ्या भावाकडून निवडणुकीच्या शर्यतीत पराभूत होतील या अंदाजाने, फतेह जंग बाजवा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपमध्ये जाणारे दुसरे काँग्रेस आमदार बलविंदर सिंग लड्डी हे हरगोबिंदपूरचे आमदार आहेत. याशिवाय अकाली दलाचे माजी आमदार गुरतेज सिंग गुधियाना, संयुक्त अकाली दलाचे माजी खासदार राजदेव सिंग खालसा आणि निवृत्त एडीसी आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील मधुमीत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, पंजाबमध्ये भाजपला काही महिन्यांपूर्वी भाजपला अकाली दलाने सोडचिठ्ठी दिली होती. भाजप सध्या निवडणूकीच्या पाश्वभूमीवर राज्यात आपली भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची योजनाही भाजपने आखली आहे. काँग्रेस आणि अकाली दलाचे आणखी नेते निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपने काँग्रेसचे माजी दिग्गज अमरिंदर सिंग आणि सुखदेव सिंग धिंडसा यांच्याशी युती केली आहे, ज्यांनी गेल्या महिन्यात पाच दशके जुन्या काँग्रेसशी संबंध तोडून पंजाब लोक काँग्रेस हा स्वत:चा पक्ष सुरु केला. गेल्या वर्षी तीनही कृषी कायदे मंजूर झाल्यानंतर अकाली दलानेही भाजपशी संबंध तोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT