Manohar Lal Khattar Dainik Gomantak
देश

स्वतंत्र उच्च न्यायालयाच्या CM खट्टर यांच्या मागणीला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिला पाठिंबा

मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शनिवारी सांगितले की, 'हरियाणा आणि पंजाबचं एकत्रित उच्च न्यायालय चंदीगडमध्ये आहे.

दैनिक गोमन्तक

पंजाब आणि हरियाणामध्ये स्वतंत्र उच्च न्यायालयांच्या मागणीबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी सांगितले की, 'हरियाणा आणि पंजाबचं एकत्रित उच्च न्यायालय चंदीगडमध्ये (Chandigarh) आहे. मात्र त्याचा जागेअभावी विस्तार होत नाहीये.' (Bhagwant Mann supported Manohar Lal Khattar's demand for an independent High Court for Haryana)

दरम्यान, 'हरियाणाचे वेगळे उच्च न्यायालय असावे, अशी आमची मागणी आम्ही लावून धरली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनीही यावर संमती दिली आहे, ही चांगली गोष्ट आहे,' असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री खट्टर पुढे म्हणाले की, ''आम्ही सध्याच्या पंजाब आणि हरियाणा (Haryana) उच्च न्यायालयाचे तीन भागात विभाजन करण्याचा विचार करत आहोत. जर दोन्ही राज्यांचे स्वतःचे उच्च न्यायालय असू शकते आणि चंदीगडलाही स्वतःचे एक छोटे उच्च न्यायालय असू शकते. तसेच आमच्या मागणीवर निर्णय गृह मंत्रालय घेईल.''

त्याच वेळी, दिल्लीतील उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त परिषदेमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, ''न्यायपालिका सार्वजनिक हिताची बनवणे आणि प्रलंबित खटले कमी करण्यावर चर्चा झाली. यासोबतच न्यायव्यवस्थेतील पायाभूत सुविधा आणि न्यायाधीशांच्या गरजा पूर्ण करण्यावरही चर्चा झाली. अजेंड्यात एकूण 7 बाबी होत्या, त्यावर एकामागून एक चर्चा झाली. ही खुली चर्चा होती.''

न्यायालयांमध्ये स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याची गरज : पंतप्रधान मोदी

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेच्या वापरावर भर देताना सांगितले की, 'यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल आणि ते त्यांच्याशी अधिक जोडले जातील.' दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'न्यायालयांमध्ये स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास तर वाढेलच शिवाय त्यांना त्याच्याशी अधिक जोडलेलेही वाटेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT