Bengaluru Crime Dainik Gomantak
देश

Bengaluru Crime: बंगळुरुमध्ये माणुसकीला काळिमा! इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर प्रेमासाठी दबाव अन् भररस्त्यात तरुणीवर हल्ला; CCTV मुळे नराधम गजाआड

Naveen Kumar Arrest In Bengaluru: कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

Manish Jadhav

Bengaluru Stalking Case: कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन, तिच्यावर प्रेमासाठी दबाव टाकत भररस्त्यात मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या भीषण घटनेचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी ज्ञानभारती पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

मैत्रीचा गैरफायदा आणि छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय नवीन कुमार एन. (रा. बिल्लमारनहल्ली, यलहंका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नवीनने काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर तो तिच्यावर प्रेमसंबंधांसाठी सक्ती करु लागला. तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार देऊनही तो तिचा सतत पाठलाग करत असे. तो केवळ मानसिकच नाही, तर तिला वारंवार अपशब्द वापरुन शारीरिकदृष्ट्या देखील प्रताडित देत असल्याचे तपासात समोर आले.

कपडे फाडण्याचा प्रयत्न

ही घटना 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:20 च्या सुमारास अधिक गंभीर वळणावर पोहोचली. आरोपी नवीन कुमार तरुणी राहत असलेल्या गेस्टहाऊजवळ दबा धरुन बसला. तरुणी दिसताच त्याने तिला अडवले आणि तिच्यावर हल्ला केला. त्याने पीडितेच्या डोक्यावर, पाठीवर आणि मानेवर सपासप वार केले. इतकेच नाही तर त्याने भररस्त्यात तिचे कपडे खेचून ते फाडण्याचा प्रयत्न केला. या अमानुष कृत्यानंतर आरोपी तिथून पसार झाला, मात्र ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

पोलिसांची वेगवान कारवाई

पीडित तरुणीने त्याच दिवशी ज्ञानभारती पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) 2023 च्या विविध कलमांनुसार (74, 75, 76, 78, 79 आणि 351(2)) गुन्हा दाखल केला. दक्षिण-पश्चिम विभागाच्या डीसीपी अनिता बी. हद्दन्नवर आणि एसीपी बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 24 तासांत नवीन कुमारला अटक केली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक रवी एम.एस. उपनिरीक्षक विजय कुमार, किरण कुमार आणि कर्मचारी हनुमंत आणि ओमकार कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या घटनेमुळे सोशल मीडियावरुन होणाऱ्या ओळखी आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "ते म्हणणं शाब्दिक अर्थाने घेऊ नका", सत्यविजय नाईकांचे 'बॅकस्टॅबिंग'; दामू नाईकांचे स्पष्टीकरण

'बर्च' प्रकरणी सह-मालक अजय गुप्ताला 5 दिवसांची पोलीस कोठडी; बनावट प्रमाणपत्रे आणि फसवणुकीचा पर्दाफाश

Rohit Sharma Century: 'हिटमॅन'चा झंझावात! रोहित शर्मानं ठोकलं वादळी शतक; सचिन-विराटच्या 'स्पेशल' क्लबमध्ये सामील VIDEO

Goa Politics: 'फ्रेंडली फाईट' ही संकल्पनाच मला मान्य नाही; 2027 साठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आलेमाव यांचे मोठे वक्तव्य

Gold Silver Rate: इतिहासात पहिल्यांदाच! 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.38 लाखांच्या पार, तर चांदी सव्वा दोन लाखांवर; आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT