Pallavi Day
Pallavi Day Dainik Gomantak
देश

बंगाली अभिनेत्री पल्लवी डे चे निधन; मनोरंजनसृष्टीत शोक

दैनिक गोमन्तक

भारतातील सिनेसृष्टीने अनेक युवा कलाकारांना कमी वयात मृत्यूला कवटाळल्याचं पाहीलं आहे. देशभरात गाजलेलं सुशांत सिंग प्रकरण यापैकीच एक होतं, यानंतर आता बंगाली मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने रविवारी (15 मे ) रोजी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Bengali actress Pallavi Dey dies; Mourning in Bengali entertainment creation )

पल्लवीने वयाच्या विसाव्या वर्षी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामूळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जीवन संपवण्यासाठी पल्लवी ने गळफास घेतला आहे. रविवारी सकाळी पल्लवीचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पल्लवीची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आली आहे.

पल्लवीच्या मृत्यूचा बंगाली मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. 'मोन माने ना' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात पल्लवी डे मुख्य भूमिकेत होती. पल्लवी बंगाली टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'Resham Jhanpi' या मालिकेमुळे पल्लवीला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

पल्लवीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या अभिनयाला आणि तिने साकारलेल्या पात्रांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत नातेवाईक आणि सहकाऱ्यांची पोलीस कसुन चौकशी करत आहेत. सर्वकाही ठीक असताना पल्लवीने आत्महत्या का केली. अथवा यात काही घातपात आहे. याचा पोलीस तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT