IIFA Awards 2022: UAE मध्ये होणारा IIFA पुरस्कार सोहळा पुढे ढकलला, कारण...

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे .
IIFA Awards 2022
IIFA Awards 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

22 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम अबुधाबी येथे होणार होता. IFA ने ट्विट करत ही माहिती दिली आहे. यापूर्वी आयफा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये होणार होता, मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (IIFA Awards 2022 latest News)

* IIFA 2022 नवीन तारखा

20 आणि 21 मे रोजी हा पुरस्कार सोहळा होणार होता. आता हा कार्यक्रम अबुधाबीमध्ये 14, 15 आणि 16 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतींच्या निधनावर आयफाने ट्विट केले की, "संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि संयुक्त अरब अमिरातीतील लोकांसोबत आमच्या मनापासून शोक व्यक्त करतो. देव त्यांना शांती देवो."

IIFA Awards 2022
सनी लिओनच्या बर्थडे पार्टीचे सेलिब्रेशन,पहा फोटो

* 40 दिवस राष्ट्रीय सुट्टी

UAE च्या राष्ट्राध्यक्षांचे शुक्रवारी निधन झाले. 73 वर्षीय शेख खलिफा यांच्या निधनाने जगभरातील लोकांनी शोक व्यक्त केला. रिपोर्टनुसार, ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनानंतर यूएईमध्ये 40 दिवसांची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

* हे स्टार्स परफॉर्म करणार आहेत

आयफा हा बॉलिवूडसाठी (Bollywood) मोठा पुरस्कार सोहळा आहे. जिथे सर्व दिग्गज स्टार्स स्टेजवर परफॉर्मन्स देतात. यावेळी सलमान खान, रणवीर सिंग, कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि इतर कलाकार कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. मात्र, तारखा जसजशा पुढे सरकतील तसतशा त्यांना त्यांच्या वेळापत्रकातून वेळ काढावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com