Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: रेल्वे स्टेशनवर 'बेल्ट वॉर'! वंदे भारतमधील IRCTC कर्मचाऱ्यांची तुंबळ हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Railway Station Fight Video: दिल्लीतील एका रेल्वे स्टेशनवरुन असाच एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

Manish Jadhav

Railway Station Fight Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. जिथे कुठे भांडण सुरु असल्याचे दिसले की लोक लगेच खिशातून फोन काढून व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. त्यानंतर काय होते, हे सर्वांनाच माहीत आहे. ते व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होतात आणि लाखो लोक ते पाहतात. 'बागपत चाट युद्ध' सारखे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच, पण आता दिल्लीतील (Delhi) एका रेल्वे स्टेशनवरुन असाच एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

रेल्वे स्टेशनवर कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेल्वे स्टेशनवर काही लोकांमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भांडणाऱ्या या सर्व लोकांच्या हातात बेल्ट्स आहेत आणि ते एकमेकांवर या बेल्ट्सने जोरदार प्रहार करत आहेत. कधी कोणी कोणावर भारी पडत आहे, तर कधी दुसरा कोणी दुसऱ्यावर आणि ही लढाई अशीच सुरु आहे. या हाणामारीच्या गोंधळात एक व्यक्ती मात्र शांतपणे आपले काम करताना दिसत आहे. तो या लढाईकडे लक्ष न देता, ट्रेनच्या एका डब्यात पाण्याची बाटली देण्यात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

IRCTC कर्मचाऱ्यांचे 'बेल्ट युद्ध'

हा व्हिडिओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर '@gharkekalesh' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये या घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. कॅप्शननुसार, ही घटना दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर घडली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आयआरसीटीसी (IRCTC) कर्मचाऱ्यांमध्ये हा वाद झाला, ज्यात त्यांनी एकमेकांवर बेल्ट्स, कचरापेटी (Dustbin) आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला.

बातमी लिहिण्यापर्यंत हा व्हिडिओ 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये झालेली ही सार्वजनिक हाणामारी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी त्यांच्या वागण्यावर टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, टी-20 वर्ल्डकपचे शेड्यूल लवकरच होणार जाहीर, आयसीसी मुंबईत करणार मोठी घोषणा

'Mhaje Ghar योजने'त 2 मोठे निर्णय! CM सावंतांचा दिलासा, 'घर मिळाले, पण...' नेमकं काय म्हणाले? वाचा

Assonora Accident: दारूच्या नशेत चालवली गाडी, थेट कोसळली कालव्यात; मित्राचा बुडून मृत्यू, संशयिताचा जामीन नाकारला

Goa ZP Election: 2 मतदान केंद्रे रद्द, नवीन केंद्राला मान्यता; दक्षिण गोव्यात जि.पं. निवडणूक वारे जोरात

Sattari Scrapyards: भंगारअड्ड्यांवर पडला छापा, गोव्यात सापडला बांगलादेशी घुसखोर; सत्तरीतील बेकायदेशीर अड्डयांमुळे 3 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत

SCROLL FOR NEXT