Viral Video: 'पापी पोटासाठी' जीवघेणा खेळ! अंगावर फटाक्यांची माळ बांधून तरुणाचा स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Firecracker Stunt Viral Video: सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक लोक हादरले आहेत.
 Firecracker Stunt Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Firecracker Stunt Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर काही वेळ आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि पाहणारे लोक विचार करत राहतात की, या व्यक्तीला हे करण्यासाठी नेमकी कोणती अशी मजबूरी असावी. तुम्ही जर सोशल मीडियावर रोज ॲक्टिव्ह असाल, तर तुमच्या फीडवरही असे अनेक धक्कादायक व्हिडिओ आले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक लोक हादरले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा!

 Firecracker Stunt Viral Video
Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी दोन खांब (Pillars) उभे असलेले दिसत आहेत. त्याखाली जमिनीवर एक सायकल आडवी ठेवून, तिच्यावर एक लाकडी फळी ठेवलेली आहे. याच फळीवर एक तरुण उभा आहे. त्याने आपल्या दोन्ही हातांनी त्या खांबांना घट्ट पकडले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाच्या कंबरेला आणि पायावर फटाक्यांची मोठी माळ (Cracker Garland) बांधलेली आहे. दुसरा एक व्यक्ती या माळेला आग लावतो आणि बघता बघता ते फटाके मोठ्या आवाजात फुटू लागतात.

फटाके फुटत असताना त्या तरुणाच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन त्याला प्रचंड वेदना होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. मात्र, 'पापी पोटासाठी' किंवा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी त्याला असे जीवघेणे कृत्य करावे लागत असावे, कारण व्हिडिओमध्ये अनेक लोक समोर उभे राहून हा स्टंट पाहत असल्याचे दिसत आहे.

 Firecracker Stunt Viral Video
Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ @PropagandaRaid नावाच्या अकाउंटवरुन X वर पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिण्यापर्यंत 89 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक यूजर्संनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • एका युजरने भावूक होत लिहिले, "तो रील बनवत नाहीये, हे 'पापी पोटाचा' प्रश्न आहे." या कमेंटमध्ये त्या तरुणाची मजबुरी अधोरेखित करण्यात आली.

  • दुसऱ्या एका युजरने लिहिले, "हा तर खूप वाईट प्रकार आहे."

  • तिसऱ्या युजरने विचारले, "ही कोणत्या गोष्टीची शिक्षा होती?"

या व्हिडिओमुळे (Video) लोकांचे लक्ष त्या तरुणाच्या हिंमतीकडे तसेच अशा प्रकारच्या धोकादायक स्टंटमागच्या त्याच्या आर्थिक गरजेकडे वेधले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com