HD Kumarswamy
HD Kumarswamy  Dainik Gomantak
देश

Karnataka Election: भाजप-काँग्रेसची वाढली धाकधूक, निकालापूर्वी 'किंगमेकर' कुमारस्वामी सिंगापूरला रवाना!

Manish Jadhav

Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अशा स्थितीत जेडीएस किंगमेकर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजप हे पक्ष आतापासूनच सक्रिय झाले आहेत. दोन्ही पक्ष निवडणुकीनंतरच्या युतीकडे लक्ष देत आहेत.

दरम्यान जेडीएसचे एचडी कुमारस्वामी सिंगापूरला रवाना झाले आहेत. ते उपचारासाठी सिंगापूरला गेले असून निकालाच्या दिवशी सायंकाळपर्यंत ते परत येऊ शकतात, असे वृत्त आहे. राज्यातील 224 विधानसभा जागांचे निकाल शनिवारी जाहीर होणार आहेत.

दुसरीकडे, केवळ इंडिया टुडे-माय अॅक्सिस आणि चाणक्य टुडेजने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. पण इतर सर्वांमध्ये, कोणीही स्वबळावर सरकार स्थापन करेल असा अंदाज नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडी कुमारस्वामी हे वैद्यकीय कारणासाठी सिंगापूरला गेले आहेत. ते 13 मे रोजीच परततील, तोपर्यंत सर्व जागांचे निकाल आलेले असतील.

काँग्रेस (Congress) आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्यांच्या जनता दल सेक्युलरशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे.

जेडीएस नेत्याने सांगितले की, “कुमारस्वामी सिंगापूरमध्ये त्यांच्या मित्रांसह विश्रांती घेत आहेत. मात्र दोन्ही पक्षांनी त्याच्याशी संपर्क साधला आहे.''

एवढेच नाही तर, जेडीएस नेत्याने पुढे सांगितले की, कोणाला बहुमत मिळाले नाही तर कोणासोबत जायचे, याचा निर्णय आम्ही घेतला आहे, मात्र योग्य वेळी त्याची घोषणा केली जाईल.

कुमारस्वामी यांनी स्वत: त्यांच्या सर्व उमेदवारांशी बोलून त्यांना आश्वासन दिले आहे की, जर कोणाला बहुमत मिळाले नाही तर आपण सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू. प

क्षाच्या नेत्याने पुढे सांगितले की, कुमारस्वामी यांना सिंगापूरमधून काँग्रेस आणि भाजपशी (BJP) सामना करणे सोपे जाईल कारण त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बंगळुरुमध्ये लक्ष ठेवले जात होते.

जेडीएसचे प्रवक्ते तन्वीर अहमद म्हणाले की, “दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. मात्र कुमारस्वामी योग्य वेळी आपले मत मांडतील. ते पुढे म्हणाले की, आम्हाला कोणासोबत सरकार बनवायचे हे पक्षाने आधीच ठरवले आहे. यावरही मतभेद असले तरी.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम म्हणाले की, आम्ही अद्याप काहीही ठरवलेले नाही. तन्वीर अहमद हे आमच्या पक्षाचे सदस्यही नाहीत. मग त्यांनी मांडलेली भूमिका कशी काय बरोबर असू शकते? निकाल आल्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT