BCCI New President Dainik Gomantak
देश

BCCI New President: बीसीसीआयला मिळाला नवा 'बॉस', मिथुन मन्हास अध्यक्षपदी विराजमान

Mithun Manhas BCCI: बीसीसीआयच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. माजी रणजी खेळाडू मिथुन मनहास यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मिथुन मन्हास यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. रविवार, २८ सप्टेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली. ते माजी क्रिकेट दिग्गज रॉजर बिन्नी यांची जागा घेतील, ज्यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिला आहे. मिथुन मन्हास हे बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष होतील असे वृत्त काही काळापासून पसरत होते. आता, याची पुष्टी झाली आहे. त्यांची या पदावर बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहतील.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी भारतीय फिरकी गोलंदाज रघुराम भट यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. याशिवाय देवजीत सैकिया यांना सचिव तर प्रभतेज भाटिया यांची संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खरंतर, बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) बीसीसीआयच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम करण्यात आली. दिल्लीच्या स्थानिक क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये जन्मलेले मिथुन दिल्लीसाठी सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले आहेत. ते मधल्या फळीचे फलंदाज होते आणि रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्व त्यांनी केलंय. मन्हास यांनी १५७ प्रथम श्रेणी सामने खेळले असून ९,७०० धावा केल्या आहेत.

तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स आणि सीएसकेसाठीही खेळले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष होणारे ते जम्मू आणि काश्मीरमधील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पंढरपूरच्या ‘बाबा’चा बेळगावात 2 कोटींचा घपला; घरबसल्या अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली 8,000 महिलांना गंडवले

Ravi Naik: काँग्रेसने 'रवीं'ना खरेच न्याय दिला नाही?

Goa Live News: 48 पणजी स्मार्ट सिटी ईव्ही बस सेवा पुन्हा सुरू

Mormugao: मुरगावातील व्यापारी पालिकेच्या रडारवर! दुकान सील, आणखी काहीजणांवर होणार कारवाई

Super Cup 2025: पंजाब FC, मुंबई सिटीने नोंदविले विजय! गोकुळम केरळा, स्पोर्टिंग क्लब दिल्लीला नमविले; मोहन बागानला धेंपो क्लबचे आव्हान

SCROLL FOR NEXT