Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Viral Cricket Video: सोशल मीडिया हे असं एक व्यासपीठ आहे, जिथे मजेशीर कंटेंटची कधीच कमतरता भासत नाही.
Viral Cricket Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Cricket Video: सोशल मीडिया हे असं एक व्यासपीठ आहे, जिथे मजेशीर कंटेंटची कधीच कमतरता भासत नाही. दररोज लाखो लोक नवनवीन व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करतात, जे आपल्या फीडवर येत राहतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आपल्याला कंटेट पाहायला मिळतो, पण काही व्हिडिओ मात्र इतके हटके असतात की ते अल्पावधीतच जगभर व्हायरल होतात. सध्या असाच एक 'गावठी राडा' असलेला व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही.

नेमकी काय आहे ही घटना?

जर तुम्ही ग्रामीण भागात राहिले असाल किंवा कधी गावाला गेला असाल, तर तुम्हाला माहीत असेल की तिथे शहरासारखे अद्ययावत स्पोर्ट्स क्लब किंवा खेळण्यासाठी मोठे पार्क नसतात. गावातली मुलं आणि तरुण रिकाम्या असलेल्या शेतातच आपली 'पिच' तयार करतात आणि तिथे क्रिकेटचा आनंद लुटतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटच्या प्रेमापेक्षा एका तरुणाचा 'इगो' जास्त दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, शेतात क्रिकेटचा (Cricket) सामना रंगणार आहे. काही तरुण हातात बॅट घेऊन मैदानात (शेतात) उभे आहेत आणि खेळाची वाट पाहत आहेत. पण इतक्यात एक तरुण ट्रॅक्टर घेऊन थेट खेळपट्टीवर येतो. त्याला खेळात बॅटिंग मिळाली नाही, या रागातून त्याने चक्क संपूर्ण शेतच नांगरायला सुरुवात केली. त्याने ज्या ठिकाणी मुलांनी खेळण्यासाठी जागा तयार केली होती, तिथून ट्रॅक्टर फिरवून ती जागा पूर्णपणे उखडून टाकली.

Viral Cricket Video
Viral Video: रेल्वे प्रवासात 'फ्री स्टाईल' हाणामारी! प्रवाशांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं; जीव वाचवण्यासाठी मुलींची पळापळ

व्हिडिओ बनवणाऱ्याने सांगितली मेख

हा व्हिडिओ शूट करणारा तरुण मागून बोलताना ऐकू येतोय की, "याला बॅटिंग मिळाली नाही, म्हणून याने रागाच्या भरात अख्खं शेतच नांगरुन टाकलं." व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की, तो तरुण निर्धास्तपणे ट्रॅक्टर चालवत आहे आणि बाकीचे सर्व खेळाडू हातात बॅट घेऊन हतबल होऊन त्याच्याकडे पाहत उभे आहेत. 'जर मी खेळणार नाही, तर कोणालाच खेळू देणार नाही' या वृत्तीचा हा एक जिवंत नमुनाच म्हणावा लागेल.

Viral Cricket Video
Viral Video: फॅशन शोमध्ये टाळ्यांचा कडकडाट थांबला अन् अचानक किंकाळी घुमली, पुढं काय झालं ते तुम्हीच बघा? मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर 'ghantaa' नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच काही तासांत हजारो लोकांनी तो पाहिला आणि लाईक केला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अत्यंत विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिले, "हा माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त समाधान देणारा क्षण आहे." दुसऱ्याने टोमणा मारत लिहिले, "याला म्हणतात - मी नाही तर कोणीच नाही!" तर तिसऱ्या एका युजरने ग्रामीण भाषेतील शब्दाचा वापर करत लिहिले, "अशा लोकांना आमच्याकडे रडतराऊ म्हणतात." काही लोकांनी "न खेलूंगा, न खेलने दूंगा" असे म्हणत या तरुणाची खिल्ली उडवली. क्रिकेटच्या वेडापायी लोक काय करतील याचा नेम नाही, हेच या व्हिडिओतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com