BCCI directs KKR to release Bangladesh Pacer Mustafizur Rahman Dainik Gomantak
देश

IPL 2025 मधून 'या' स्टार खेळाडूची हकालपट्टी? 'BCCI'नं दिला आदेश, केकेआरनं 9.20 कोटींना केलं होतं खरेदी VIDEO

BCCI directs KKR to release Bangladesh Pacer Mustafizur Rahman: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामापूर्वी क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Sameer Amunekar

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामापूर्वी क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या फ्रँचायझीला स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्यांनी मुस्तफिजुरला त्वरित आपल्या संघातून मुक्त (Release) करावे. नुकत्याच झालेल्या लिलावात शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआरने या डावखुऱ्या पेसरवर ९.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावली होती.

बीसीसीआयचा निर्णय आणि सुरक्षेचे कारण

बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी शनिवारी, ३ जानेवारी रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सैकिया म्हणाले की, "बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुर रहमानला रिलीज करण्याचे निर्देश दिले आहेत." मात्र, केकेआरला या निर्णयामुळे खेळाडूचे नुकसान सोसावे लागू नये म्हणून बोर्डाने मुस्तफिजुरच्या जागी दुसऱ्या कोणत्याही परदेशी खेळाडूची निवड (Replacement) करण्याची मुभा दिली आहे.

बांगलादेशातील हिंसाचार

मुस्तफिजुर रहमानला बाहेर काढण्यामागे बांगलादेशात हिंदू समुदायावर होत असलेले अत्याचार आणि तिथली अस्थिर परिस्थिती हे प्रमुख कारण मानले जात आहे. बांगलादेशात अलीकडच्या काळात अल्पसंख्यांकांविरुद्ध झालेल्या हिंसक घटनांमुळे भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जेव्हा केकेआरने लिलावात एका बांगलादेशी खेळाडूला कोट्यवधी रुपये देऊन विकत घेतले, तेव्हापासून सोशल मीडियावर शाहरुख खान आणि त्याच्या संघावर टीकेची झोड उठली होती. अनेक राजकीय नेत्यांनीही या खरेदीला विरोध दर्शवला होता. लोकांचा वाढता रोष आणि सुरक्षिततेचा प्रश्न पाहता बीसीसीआयने हे कडक पाऊल उचलले आहे.

भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिकेवर प्रश्नचिन्ह

या निर्णयाचा परिणाम आता आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांवरही होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता, ज्यामध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार होती. खरंतर हा दौरा २०२५ मध्येच होणार होता, परंतु तिथल्या हिंसाचारामुळे तो २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. आता आयपीएलमधून बांगलादेशी खेळाडूला हटवल्यानंतर, भारतीय संघ बांगलादेशला जाणार का? याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT