Bank Holidays Diwali 2025 Dainik Gomantak
देश

Bank Holidays Diwali 2025: दिवाळीला 'महा-वीकेंड', सरकारी सुट्टी कधीपासून कधीपर्यंत? बँका आठवड्यात किती दिवस राहणार बंद?

Bank holidays in October 2025 : देशभरात सणांचा हंगाम सुरू असून दिवाळीच्या आगमनाची उत्सुकता सर्वत्र दिसून येत आहे.

Sameer Amunekar

देशभरात सणांचा हंगाम सुरू असून दिवाळीच्या आगमनाची उत्सुकता सर्वत्र दिसून येत आहे. दिवाळी आता काही दिवसांवर आली असून, लोक सणाच्या तयारीत गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर, बँकांचे व्यवहार करायचे असतील तर ग्राहकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण दिवाळी आठवड्यात देशभरातील बँकांना सलग काही दिवस सुट्ट्या असणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, सोमवार, २० ऑक्टोबर ते रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ या दरम्यानच्या आठवड्यात सातपैकी सहा दिवस बँकांना सुट्ट्या असतील. त्यामुळे बँकिंग कामकाजाची योजना आखताना ग्राहकांनी या तारखांची नोंद ठेवणे गरजेचे आहे.

दिवाळी आठवड्यातील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक

२० ऑक्टोबर २०२५ (सोमवार)
दिवाळी सण आणि संबंधित सणांच्या निमित्ताने अगरतळा, अहमदाबाद, ऐझवाल, बेंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, नवी दिल्ली, पणजी, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे बँका बंद राहतील.

२१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार)
लक्ष्मीपूजन आणि गोवर्धन पूजा निमित्त बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, गंगटोक, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर आणि श्रीनगर येथे बँका बंद राहतील.

२२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार)
दिवाळी (बलीप्रतिपदा), विक्रम संवत नववर्ष दिन आणि गोवर्धन पूजा निमित्त अहमदाबाद, बेंगळुरू, डेहराडून, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँकांना सुट्टी असेल.

२३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार)
भाऊबीज, भाईदूज, चित्रगुप्त जयंती आणि निंगोल चक्कौबा निमित्त अहमदाबाद, गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.

२५ ऑक्टोबर २०२५ (शनिवार)
चौथा शनिवार असल्याने देशभरात सर्व बँका बंद राहतील.

२६ ऑक्टोबर २०२५ (रविवार)
रविवारची नियमित सुट्टी असल्याने सर्वत्र बँका बंद राहतील.

'या' ऑनलाइन सेवा मात्र उपलब्ध राहतील

सुट्टीच्या दिवशी ग्राहक नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI व्यवहार सहज करू शकतील. त्यामुळे रोख रक्कम काढणे किंवा देयकांची देवाणघेवाण यांसाठी डिजिटल सेवा वापरण्याचे आवाहन बँकांनी ग्राहकांना केले आहे.

दिवाळीच्या आठवड्यात बहुतेक दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे, कोणतेही आर्थिक व्यवहार, कर्ज अर्ज, चेक क्लिअरन्स किंवा रोकड व्यवहार आधीच पूर्ण करून घ्या. ऑनलाइन सेवांच्या मदतीने मात्र तुमचे दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT