Omicron Update Dainik Gomantak
देश

बेंगळुरूमध्ये 10 परदेशी नागरिक ओमिक्रॉनच्या भीतीमुळे बेपत्ता, फोनही बंद

अशा स्थितीत या परदेशी नागरिकांशी संपर्क होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Omicron Update : दक्षिण आफ्रिकेतील 10 परदेशी नागरिक कर्नाटकातील बेंगळुरू (Bangalore) शहरात बेपत्ता झाले आहेत. बंगळुरू महानगरपालिका आणि आरोग्य अधिकारी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचे मोबाईल बंद असल्यामुळे संपर्क होत नाही. दरम्यान ओमिक्रॉनचे (Omicron) भारतातील पहिले रुग्ण देखील बंगळुरू शहरातच आढळला होता. तो रुग्ण देखील दक्षिण आफ्रिकेतूनच (AfricanCountries) परतला होता. अशा स्थितीत या परदेशी नागरिकांशी संपर्क होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.

हे सर्व नागरिक दक्षिण आफ्रिकेतून परतल्याचे सांगण्यात येत आहे. पण सर्वात चिंतेची बाब म्हणजे हे सर्व फोन बंद करून पसार झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा शोध घेता येत नाही. बेंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले की, सर्व परदेशी नागरिक दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत. त्यांचे फोनही बंद येत आहेत. मात्र, आरोग्य विभाग त्यांचा शोध घेत आहे.

ओमिक्रॉनच्या सावटानंतर आतापर्यंत 57 प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूला आले आहेत. त्यापैकी हे 10 प्रवाशांना शोधण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे. त्यांचे फोनही बंद आहेत. या प्रवाशांनी विमानतळावर दिलेल्या पत्त्यावरही ते सापडलेले नाहीत.

भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन रुग्ण आढळून आले आहेत, तसेच आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमिक्रॉनशी संबंधित रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओने यावर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. गुरुवारी, बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनची दोन रुग्ण आढळून असल्याची नोंद झाली आहे. दोन्ही रुग्ण 66 आणि 46 वर्षांचे आहेत. दोघांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. याशिवाय या दोन्ही रुग्णांच्या निदानांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT