Uttar Pradesh Crime Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: गुरुच्या नावाला कलंक, विद्यार्थ्याच्या आईशी ठेवले संबंध; त्याने मला...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बलिया येथे ट्यूशन टीचरचे काळे कृत्य समोर आले आहे. पोलिसांनी त्या टीचरला अटक केली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बलिया येथे ट्यूशन टीचरचे काळे कृत्य समोर आले आहे. पोलिसांनी त्या टीचरला अटक केली आहे. सदर कोतवाली भागातील हे प्रकरण आहे.

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईशी टीचरने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ बनवून दोन वर्षांपासून तो महिलेला ब्लॅकमेल करत होता. पीडितेच्या तक्रारीवरुन सदर कोतवाली येथे गुन्हा दाखल करुन आरोपी मनीष पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधीक्षक एस आनंद सांगतात, 'पीडितेने पोलिसांना सांगितले की, मनीष नावाच्या एका टीचरचे तिच्या घरी येणे-जाणे होते, त्यानंतर त्यांच्यात काही संबंध होते, ज्याचा चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ काढण्यात आला, त्यानंतर तो ब्लॅकमेल करत राहिला.' पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली आहे.

बळजबरीने संबंध, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

पीडित महिलेने (Women) सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत लिहिले आहे की, 'मनीष पांडे माझ्या घरी मुलांना शिकवण्यासाठी यायचे, तेव्हापासून त्यांचे माझ्या घरी येणे-जाणे होते, एके दिवशी त्याने जबरदस्तीने संबंध ठेवत व्हिडिओ बनवला. मला, याबाबत मी पोलिसात तक्रार केल्यास त्याने व्हिडीओ व्हायरल करुन जीवे मारण्याची धमकी दिली.'

माझ्यासोबत कोणतीही घटना घडू शकते - पीडिता

तो माझ्यासोबत कधीही कोणतीही घटना घडवू शकतो, माझ्या मुलांचे अपहरण करुन त्यांची हत्या करु शकतो, त्यामुळे मी न्यायासाठी याचना केल्याचे पीडितेने सांगितले. पोलिसांनी आरोपी टीचरविरुद्ध कलम 358/2023, कलम 376/506 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी मनीष पांडे याला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT