Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तांत्रिकाच्या घराबाहेर विष प्राशन करुन आत्महत्या केली.
महिलेचा आरोप होता की, तांत्रिकाने आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, नंतर तिच्याच मुलीबरोबर पळून गेला.
याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र पोलिसांनी कारवाईला दिरंगाई केल्याने सोमवारी ही महिला तांत्रिकाच्या घराबाहेर धरणे आंदोलनावर बसली होती. दुसरीकडे, तांत्रिकाच्या नातेवाईकांनी तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला असता तिने विष प्राशन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजच्या पूरमुफ्ती पोलीस स्टेशन परिसरातील लाल बिहरा येथील रहिवासी असलेल्या महिलेचा पती मदन आजारी होता. नवऱ्याचा आजार बरा व्हावा यासाठी ती तांत्रिकाकडे गेली होती.
यादरम्यान तांत्रिकाने आधी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिच्या मुलीला घेऊन पळून गेला. याप्रकरणी महिलेने पिपरी पोलिस ठाण्यात आरोपी तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, महिला आरोपी तांत्रिकाच्या घराबाहेर धरणे आंदोलनावर बसली होती. तेथून आरोपीशी तिचे फोनवर बोलणेही झाले होते. यामध्ये तिने पहिल्यांदा मुलीला सोडण्याची विनवणी केली, परंतु नंतर तिचे तांत्रिकाशी भांडण झाले. दुसरीकडे, आरोपीच्या नातेवाईकांनी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर महिलेने विष प्राशन केले.
दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच पिपरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
अशा परिस्थितीत मोठ्या आशेने पीडिता पती मदनसोबत आरोपीच्या घरी पोहोचली होती. जिथे आरोपीने मदन तसेच पीडिता आणि तिच्या मुलीला भूत-भ्रष्टाच्या नावाखाली आपल्या घरात ठेवले. याच काळात तांत्रिकाने महिलेला धमकावत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
दरम्यान, आरोपीची (Accused) नजर महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर पडताच आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. यादरम्यान आरोपीने महिलेच्या मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केला.
मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करुनही यश न आल्याने महिलेने 19 जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी तांत्रिक राजू आणि त्याचे तीन भाऊ विजय, अमर आणि सुरेंद्र यांच्याविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
दरम्यान, महिला आरोपी तांत्रिकाच्या घरी पोहोचली. तिने आपल्या मुलीला सोडण्याची विनवणी केली, मात्र आरोपीच्या नातेवाईकांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
तसेच, कसा बसा मोबाईल नंबर मिळवून पीडितेने आरोपीशी संपर्कही केला, मात्र त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर महिलेने आरोपीच्या घराबाहेरचं विष प्राशन केले.
यानंतर तांत्रिकाच्या नातेवाईकांनी महिलेच्या कुटुंबीयांना फोन करुन तिची प्रकृती खालावल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेचे कुटुंबीय तिथे तात्काळ पोहोचले आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
आता पोलिसांनी महिलेचा (Women) मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक समर बहादूर सिंग यांनी या घटनेला दुजोरा दिला. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.