Baldev Kaur, mother of AAP's Labh Singh ANI
देश

'मी नाही तर मुलगा आमदार झालाय, मी अजूनही सफाई कामगारच'

मी कंत्राटी सफाई कामगाराची नोकरी सोडणार नाही, आपचे उमेदवार लाभसिंग उगोके याच्या आईंनी दाखवली कर्तव्यनिष्ठता

दैनिक गोमन्तक

पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आपचे उमेदवार लाभसिंग उगोके (Labh Singh) यांनी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा पराभव केला. या पराक्रमानंतर उगोके चर्चेत आले आहेत. ते कोण आहेत, ते काय करतात अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. उगोके यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे तर त्यांची आई एक सफाई कामगार आहे, ज्याचा त्यांना अभिमान आहे. इतकचं नाही तर मुलगा विजयी झाला असला तरी आई सफाई कामगाराची नोकरी सोडण्यास तयार नाहीत, त्यांच्या या कृतीमुळे त्यांनी सर्वांचेच मन जिंकले आहे. (Baldev Kaur mother of AAP Labh Singh not left sweeper job)

लाभसिंह यांच्या आई बलदेव कौर (Baldev Kaur) या सरकारी शाळेत कंत्राटी सफाई कामगार आहेत. शुक्रवारी त्या झाडू घेऊन ड्युटीसाठी पोहोचल्या तेव्हा बलदेव यांनी सर्वांनाच चकित केले. एक दिवस आधी, त्यांच्या मुलाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा 37 हजार 558 च्या मोठ्या फरकाने पराभव केला आणि दुसऱ्या दिवशी त्या आपल्या कामावर रूजू झाल्या होत्या. त्यांच्या कृतीने आणि कामाप्रति असलेल्या प्रामाणिकपणामुळे बलदेव कौर यांनी माध्यमांचे आणि सर्वसामान्यांचेही लक्ष वेधले.

यावेळी बोलताना बलदेव म्हणाल्या, "माझ्या मुलाच्या विजयानंतर (Punjab Assembly Election) किमान एक दिवस तरी मी कामावर येणार नाही, असे सर्वांना वाटत होते. पण मी हे स्पष्ट केले की माझा मुलगा आमदार झाला आहे, मी नाही. मी अजूनही कंत्राटी सफाई कामगार आहे. त्यामुळे मुलगा आमदार झाला म्हणून मी माझी नोकरी का सोडू? आणि मी जे करत आहे त्याचा मला अभिमान आहे. आमचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी धडपडत असताना माझी हिच नोकरी आमच्या कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत होता आणि आताही आहे."

सेवा नियमित न केल्याने संतापलेल्या

बलदेव कौर यांचे वय आता 50 वर्षांहून अधिक आहे. त्या गेल्या 22 वर्षांपासून बर्नाळा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी उगोके येथील शाळेत कार्यरत आहे. मात्र अद्याप त्यांची नोकरी नियमीत नाही. त्यामुळे त्यांचा सरकारवर प्रचंड रोष आहे. त्या म्हणाल्या की, माझी नोकरी नियमिती करणासाठी मी वारंवार सरकारी ऑफिसच्या चकरा घातल्या. मात्र प्रत्येक वेळी तो प्रस्ताव फेटाळण्यात आला.

'वास्तविक विरुद्ध कृत्रिम गरीब' हा निवडणूक मुद्दा यशस्वी ठरला होता

बलदेव कौर यांच्या घरातून आणि त्यांच्या वागणुकीतून कुटुंबाची नम्रता दिसून येते. मुख्यमंत्री चन्नी यांच्या विरोधात 'खरे विरुद्ध कृत्रिम गरीब' हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यात लाभसिंह यशस्वी ठरले. बलदेव कौर यांचे पती दर्शन सिंह हे आयुष्यभर मजूर होते, पण नुकतेच डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांनी काम करणे बंद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT