बाबर आझमचे जगभरात चाहते आहेत आणि तो जगातील सर्वोत्तम टी-२० खेळाडूंमध्ये गणला जातो. आता त्याला बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी प्री-ड्राफ्टद्वारे सिडनी सिक्सर्स संघाने करारबद्ध केले आहे. बाबर पहिल्यांदाच बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. शाहीन आफ्रिदी, शादाब खान, हरिस रौफ आणि मोहम्मद रिझवान हे बीबीएलच्या पुढील हंगामात खेळणार आहेत.
बीबीएलमध्ये खेळण्याबद्दल बाबर आझम म्हणाला की, जगातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेट लीगपैकी एकामध्ये खेळणे आणि अशा यशस्वी फ्रँचायझीचा भाग होणे ही एक रोमांचक संधी आहे. मी संघाच्या यशात योगदान देण्यास, चाहत्यांशी एक मजबूत संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहे.
बाबर आझमला टी-२० क्रिकेटमध्ये भरपूर अनुभव आहे, जो सिडनी सिक्सर्स संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये पाकिस्तान राष्ट्रीय संघाचा आणि पेशावर झल्मीचा कर्णधार राहिला आहे.
त्याने टी-२० क्रिकेटच्या ३२० सामन्यांमध्ये एकूण ११३३० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ११ शतके आणि ९३ अर्धशतके झाली आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२२ धावा आहे.
बाबर आझमने जगभरातील टी-२० लीगमध्ये क्रिकेट खेळले आहे. यामध्ये कॅरिबियन प्रीमियर लीग, लंका प्रीमियर लीग आणि इंग्लंडमधील व्हिटॅलिटी ब्लास्ट यांचा समावेश आहे.
सिडनी सिक्सर्सच्या महाव्यवस्थापक राहेल हेन्स म्हणाल्या की बाबरचं कौशल्य आणि अनुभव आमच्या खेळाडू गटासाठी खूप मौल्यवान आहेत आणि ही बातमी आमच्या चाहत्यांसाठी रोमांचक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.