Congress leaders are sharing this picture of former Prime Minister Jawaharlal Nehru
Congress leaders are sharing this picture of former Prime Minister Jawaharlal Nehru Twitter
देश

BJP vs Congress: सोशल मिडीया अकाऊंटवरील तिरंग्याच्या फोटोंवरुन वाद शिगेला

दैनिक गोमन्तक

​​BJP VS Congress: कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसोबत तिरंगा असलेला फोटो शेअर केला आहे. तर भाजप नेते मनोज तिवारी यांनी या DPची खिल्ली उडवली आहे. भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, 'आता विरोधकांना तिरंग्यातही भाजप दिसू लागला असेल तर काय म्हणावे.कुठे लिहिले आहे की नेहरूजींनी तिरंगा उचलला तर आता राहुल गांधी उचलू शकत नाहीत. आज राहुल गांधींसाठी हिरो बनण्याची संधी होती, जी त्यांनी गमावली आहे.' (Congress leaders are sharing of former Prime Minister Jawaharlal Nehru Photo)

राहुल गांधींनी माजी पंतप्रधान नेहरूजींचा फोटो ट्विट केला आहे. आणि त्याला, "आमचा तिरंगा देशाची शान आहे, आमचा तिरंगा प्रत्येक हिंदुस्थानींच्या हृदयात आहे." असे कॅप्शन दिले आहे. त्याचवेळी प्रियंका गांधींनी, "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा" असे कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

या वर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याचा आनंद साजरा करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) कार्यक्रम साजरा करत आहे. या अंतर्गत पीएम मोदींनी 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन यापूर्वीच्या मन की बातच्या माध्यमातून लोकांना केले आहे.

त्याचबरोबर भाजपशासित राज्यांमध्ये हर-घर तिरंगा ही मोहीमही राबवली जात आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनीही तिरंगा प्रचारात भाग घेतला. पीएम मोदींनी त्यांच्या सोशल अकाऊंटवर प्रोफाईल पिक्चरमध्ये तिरंगा टाकल्यानंतर काँग्रेसची ही खेळी समोर आली. काँग्रेसनेही या प्रचारात भाग घेतला, पण डीपीमध्ये तिरंग्यासह माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावून भाजपला टोला लगावला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरएसएस आणि सरसंघचालकांवर निशाणा साधताना लिहिले की, "आम्ही आमचे नेते नेहरूंचा डीपी हातात तिरंगा घेऊन लावत आहोत, पण पंतप्रधानांचा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला नाही असे दिसते. ज्यांनी 52 वर्षे नागपुरातील मुख्यालयात ध्वज फडकावला नाही, ते पंतप्रधानांची आज्ञा मानतील का?" असा सवाल करत संघावर निशाना साधला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT