Ram Mandir in Ayodhya  Dainik Gomantak
देश

Ayodhya Ram Temple: 'प्रभू रामाने ज्यांना बोलवलं तेच अयोध्येला येतील', प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रणावरुन वाद

धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण केले जात असल्याचा सीपीआय (एम) चा आरोप

Pramod Yadav

Ayodhya Ram Temple: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात राजकीय नेत्यांसह कलाकारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

तर, काही नेते मंडळींना निमंत्रण न मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सीपीआय (एम) नेत्या वृंदा करात यांनी कार्यक्रमाला येण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

'आमचा पक्ष अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात सहभागी होणार नाही. आम्ही धार्मिक श्रद्धांचा आदर करतो, पण सरकार धार्मिक कार्यक्रमाला राजकारणाशी जोडत आहेत. हे धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण केले जात आहे, हे योग्य नाही.”

याबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रत्येकाला निमंत्रण देण्यात आले आहे. अभिषेक सोहळ्यासाठी ज्यांना प्रभू रामाने बोलावले आहे तेच अयोध्येला येतील, असे लेखी म्हणाल्या.

केवळ काही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना अभिषेक कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल, असे राम मंदिर ट्रस्टने आधीच सांगितले आहे. ज्या पक्षांना निमंत्रण पाठवले जात आहे ते पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. सोहळ्याची सध्या जोरात तयारी सुरू आहे.

या कार्यक्रमात 6 हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्राण प्रतिष्ठा’ होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित लोक हजेरी लावणार असल्याने अयोध्येतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांनी हा सोहळा फक्त दूरचित्रवाणीवर थेट पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध संप्रदायातील सुमारे 4,000 संतांना आमंत्रित करण्यात आल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT