Ramlala will be kept in a silver swing of 21kg Dainik Gomantak
देश

अयोध्येत 493 वर्षांनंतर चांदीच्या झुल्यात बसणार रामलल्ला

Ayodhya: रामललाचे मुख्य आचार्य सत्येंद्रदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, झुल्यावर रामलल्लासह त्यांच्या चार भावांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी विशेष पूजा केली जाईल.

दैनिक गोमन्तक

अयोध्येच्या (Ayodhya) रामलल्लासाठी चांदीचा झुला तयार करण्यात आला आहे. श्रावण शुक्ल पंचमीच्या शुभमहूर्तावर शुक्रवारी झोपाळा गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे, ज्यावर रामलल्लासह (Shri Ram) चारही भावांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.रामलल्लाचा झुल्याचा धार्मिक कार्यक्रम श्रावण पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 22 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. रामलल्लाला यापुर्वीदेखील दरवर्षी पंचमीपासून शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपर्यंत झुल्यावर ठेवण्यात येत होते, मात्र तो झुला लाकडाचा होता. या वेळी रामजन्मभूमी ट्रस्टने रामलल्लाच्या प्रतिष्ठेनुसार चांदीची झुला तयार केला आहे. (Ramlala will be kept in a silver swing of 21kg )

493 वर्षांपूर्वीपासुन रामाची सेवा दुर्लक्षित राहिली आहे. सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या निर्णयामुळे केवळ भव्य मंदिर बांधले जात नसुन, श्रद्धेच्या सर्वोच्च केंद्रस्थानी आयोजित केले जाणारे सर्व सण रामलल्लाच्या दरबारात आयोजित केले जाणार आहेत. रामजन्मभूमी येथील वादग्रस्त वातावरण आणि सर्व परिस्थितीमुळे या सगळ्या सण उत्सवांपासुन शतकानुशतके वंचित आहे. या अनुक्रमात श्रावनच्या परंपरेनुसार शुक्रवारपासून रामलला झुल्यात ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.

21 किलो चांदीचा झूला

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय संपूर्ण उत्साहाने रामललाला झुल्यात ठेवण्याची तयारी करत आहेत. रामलल्लाचे मुख्य आचार्य सत्येंद्रदास यांच्या मते, झुल्यावर रामलल्लासह चार भावांच्या मुर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यापूर्वी विशेष पूजा केली जाईल. जगद्गुरु रामानुजाचार्य डॉ. राघवाचार्य यांच्या मते, हा केवळ सनातन उपासना परंपरेचा गौरव नसुन संपूर्ण भारतीयत्वाच्या गौरवाचा क्षण आहे. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 21 किलो चांदीपासून हा झुला तयार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT