Ayodhya Ram Mandir Train Dainik Gomantak
देश

Ram Mandir: 'जय श्री राम'चा नारा ऐकून संतप्त; अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी

Ayodhya Ram Mandir: अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

Manish Jadhav

Ayodhya Ram Mandir: अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. बंगळुरु पोलिसांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली तीन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही विशेष ट्रेन अयोध्येहून म्हैसूरला यात्रेकरुंना घेऊन परतत होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.40 च्या सुमारास तिघे आरोपी ट्रेनच्या दुसऱ्या बोगीत चढले होते. यावेळी भाविकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्यावर त्यांनी ट्रेन जाळण्याची धमकी दिली. यावर ट्रेनमधील बाकीचे प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी त्यांना पकडले. यानंतर त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेतल्याने लोकांनी पुन्हा गोंधळ घातला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बातमी पसरताच शेकडो भाजप कार्यकर्ते आणि समर्थक रेल्वे स्टेशनवर जमा झाले. त्यांनी तिन्ही आरोपींच्या अटकेची मागणी केली. तापलेले वातावरण पाहून बेल्लारीचे पोलीस अधीक्षक बीएल श्रीहरीबाबू पोलीस फौजफाट्यासह रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी सांगितले की, 'या घटनेप्रकरणी आम्ही हॉस्पेट येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 295A (धार्मिक भावना भडकवण्याच्या उद्देशाने दुर्भावनापूर्ण कृत्ये), 504 (जाणूनबुजून अपमान करणे), 506 (जीवे मारण्याची धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. उर्वरित 2 आरोपींचा शोध सुरु आहे.

काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे: भाजप नेते

दरम्यान, या घटनेचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ''व्होट बँकेसाठी काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. अशा धमक्या देणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन महिना उलटला असला तरी लोकांचा उत्साह कमी झालेला नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT