191 feet saffron flag Dainik Gomantak
देश

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

significance of saffron flag: या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरात होणारे भव्य आणि विशाल ध्वजारोहण समारोह.

Akshata Chhatre

Ayodhya Ram Mandir flag hoisting: रामनगरी अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरात आज म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२५ रोजी एक ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. मंदिरात पहिल्यांदाच 'राम सीता विवाह उत्सव' मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरात होणारे भव्य आणि विशाल ध्वजारोहण समारोह. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असून, ते मंदिराच्या शिखरावर १९१ फूट उंचीवर हा ध्वज फडकवतील.

१९१ फूट उंचीवर फडकणार सूर्यवंश आणि 'ॐ'चे प्रतीक

श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी या ध्वजाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. राम मंदिराचे शिखर १६१ फूट उंच आहे, ज्यावर ३० फूट उंच ध्वजदंड बसवण्यात आला असल्याने ध्वजाची एकूण उंची सुमारे १९१ फूट असेल. शिखरावर केशरी रंगाचा हा ध्वज फडकवला जाईल. ध्वजावर सूर्यचिन्ह, सूर्याच्या मध्यभागी 'ॐ' आणि सोबत कोविदार वृक्ष रेखाटलेला आहे. संपूर्ण ध्वजातून अयोध्याचा इतिहास, सूर्यवंशाची परंपरा आणि रामायणाची महती दर्शवली गेली आहे.

गुजरातच्या कारागिरांनी बनवलेला खास ध्वज

राम मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा हा विशेष ध्वज गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील कारागीर कश्यप मेवाड़ा आणि त्यांच्या टीमने तयार केला आहे. हा ध्वज तीन पदरी कपड्यापासून बनवण्यात आला असून, तो पूर्णपणे हातमागावर आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे.

"या खास ध्वजाला कारागिरांनी मोठी श्रद्धा आणि निष्ठा ठेवून तयार केले, ध्वजात लागलेल्या प्रत्येक धाग्यात भक्ती आणि भावना पिरोवलेली आहे," असे कश्यप मेवाड़ा म्हणालेत.

२५० किमी प्रतितास वेगवान वारे झेलण्याची क्षमता

ध्वजाला खास नायलॉन फॅब्रिकमधून बनवले आहे, जो पॅराशूटसाठी वापरला जातो. हे फॅब्रिक अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असल्याने हा पॅराशूट फॅब्रिक २०० किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे सहजपणे झेलू शकतो. हा ध्वज लवकर फाटणार नाही किंवा त्याला छिद्र पडणार नाही.

ध्वजाचे वजन २ ते ३ किलो असून, तो सुमारे ३ वर्षांपर्यंत फडकवल्याप्रमाणेच कायम राहील. ऊन आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर डबल कोटेड सिंथेटिक लेयर लावण्यात आला आहे. शिखरावर फडकणारा हा ध्वज सुमारे ४ किलोमीटर दूरपर्यंत सहजपणे दिसू शकेल.

'ॐ' आणि कोविदार वृक्षाचे रहस्य

ध्वजावर अंकित असलेले प्रत्येक प्रतीक हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडवून आहे: सूर्य, 'ॐ' आणि कोविदार वृक्ष हे सूर्यवंशाचे प्रतीक आहेत. 'ॐ' संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आणि शांती देणारा पवित्र मंत्र आहे. सूर्य जीवन आणि प्रकाशाचे प्रतीक आहे, तर 'ॐ' आत्मा आणि परमात्म्याचे प्रतीक आहे.

हा वृक्ष अयोध्या नगरीचा राजवृक्ष होता. वाल्मीकि रामायणात या वृक्षाचा उल्लेख आहे. हरिवंश पुराणानुसार, भरत जेव्हा प्रभू राम यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांच्या रथावर याच वृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज होता. त्यामुळे रामराज्याचे प्रतीक म्हणून 'कोविदार'ला ध्वजात स्थान मिळाले आहे. राम मंदिरातील हा ध्वजारोहण सोहळा भारतीय संस्कृती, भक्ती आणि शौर्य यांचा अनोखा संगम असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT