Shri Ram Digvijay Yatra: 'माझ्या मागे श्री रामाचे बळ'! बद्रीनाथ ते काणकोणपर्यंत श्रीराम दिग्विजय रथाचा प्रवास; चालकाचे 8000 किमी सारथ्य

Shri Ram Digvijay Yatra Goa: गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या श्री राम दिग्विजय यात्रेचे काणकोणात आगमन झाले.
Shri Ram Digvijay Yatra
Shri Ram Digvijay YatraDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या श्री राम दिग्विजय यात्रेचे काणकोणात आगमन झाले. कारवार मुडगेरी मठातून लोलये येथील श्री दामोदर देवालय, केशव देवालय, श्री निराकार देवालय व त्यानंतर पैंगीण येथील श्री परशुराम देवालयात भाविकांनी या रथयात्रेचे भव्य स्वागत केले.

काही ठिकाणी आतषबाजी, लेझीम आणि दिंडीने स्वागत करण्यात आले. श्री परशुराम देवालय समितीचे अध्यक्ष हरिष प्रभुगावकर, उदय प्रभुगावकर, ज्ञानानंद प्रभुगावकर तसेच समितीच्या अन्य सदस्यांनी रथाचे स्वागत केले.

Shri Ram Digvijay Yatra
मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

पैंगीण पंचायतीतर्फे सरपंच सविता तवडकर, उपसरपंच सुनील पैंगणकर, पंच प्रवीर भंडारी, महेश नाईक, सतीश पैंगीणकर यांनी रथाचे स्वागत केले. या रथयात्रेचा मुक्काम श्री परशुराम देवालयात आहे. या रथयात्रेचे वास्कोकडे प्रयाण होणार आहे.

Shri Ram Digvijay Yatra
Tallest Ram statue in Goa India: गोव्यात उभारला जातोय देशातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा; 28 नोव्हेंबरला PM मोदी करणार अनावरण

८ हजार किलोमीटर रथाचे सारथ्य

होन्नावर येथील संतोष पै यांनी बद्रीनाथ ते काणकोणपर्यंत तब्बल ८ हजार किलोमीटर रथाचे सारथ्य केले. या प्र डोंगराळ रस्ता, प्रतिकूल वातावरण यांचा सामना करत त्यांनी हा प्रवास केला. माझ्या मागे श्री रामाचे बळ आहे. त्यामुळेच हा प्रवास शक्य झाल्याचे संतोष पै यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com