India vs Pakistan Dainik Gomantak
देश

India vs Pakistan: टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत; पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? प्रशिक्षकांनी दिलं अपडेट

Asia Cup 2025 India vs Pakistan: ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल जखमी झाला आहे.

Sameer Amunekar

India vs Pakistan Asia Cup 2025 Axar Patel injury update

ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल जखमी झाला आहे. आशिया कप २०२५ मधील या सामन्यात डावाच्या १५व्या षटकात मिड-ऑफवर क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. शिवम दुबेने टाकलेल्या शॉर्ट-पिच चेंडूवर ओमानचा हमद मिर्झा फटका खेळला. अक्षरने झेल घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केला, पण उडी मारताना त्याचे डोके जमिनीवर आदळले. त्यामुळे त्याला ताबडतोब मैदान सोडावे लागले आणि त्याच्या जागी रिंकू सिंगला क्षेत्ररक्षणासाठी उतरवण्यात आले.

अक्षर पटेलने या सामन्यात गोलंदाजीतून फक्त एक षटक टाकले, पण फलंदाजीतून त्याने दमदार खेळी केली. त्याने केवळ १३ चेंडूत २६ धावा ठोकल्या, त्यात तीन चौकार आणि एक षटकार होता. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २०० इतका होता, ज्यामुळे भारताच्या धावफलकाला चांगली गती मिळाली.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी अक्षरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिला. त्यांनी सांगितले, "मी अक्षरला नुकतेच पाहिले आहे आणि तो सध्या ठीक दिसत आहे. मी आत्ता एवढेच सांगू शकतो." त्यांच्या या विधानामुळे चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला असला, तरी पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

दरम्यान, भारताने आशिया कप २०२५ मधील आतापर्यंतचे तीनही सामने जिंकले असून सुपर फोरमध्ये दमदार प्रवेश केला आहे. पुढील सामना २१ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

या सामन्याबद्दल बोलताना टी. दिलीप म्हणाले, "आम्हाला प्रत्येक सामन्याचे वेळापत्रक माहित आहे आणि आम्ही सर्व सामने एकसमान गांभीर्याने खेळतो. प्रत्येक खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे साकारणार 'रावणाच्या बायको'ची भूमिका, संत-समाजाचा तीव्र आक्षेप; "हिला शूर्पणखा करा"

Bicholim: सुशेगाद म्हणजे 'आळशी' नाही, तर 'समाधानी'; डिचोलीतील गावांची कृषी पोसणारा 'ओहळ'

जाल्यार देवतले रस्त्यार...! पिसुर्लेत मुख्याध्यापकांच्या बदलीला विरोध

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय' इरफान पठाणच्या टीकेवर शाहिद आफ्रिदी भडकला; म्हणाला, "मी त्याला मर्द..."

'ना काँग्रेस ना लालू, बिहारमध्ये यापूर्वी असा विकास कधीच झाला नाही'; पुन्हा NDA जिंकणार प्रमोद सावंत यांचा विश्वास

SCROLL FOR NEXT