Aviation Academy plane crash Twitter
देश

एव्हिएशन अकादमीच्या विमानाचा भीषण अपघात पायलटचा मृत्यू

आंध्र प्रदेशात एव्हिएशन अकादमीचे विमान विजेच्या खांबाला आदळून अपघात

दैनिक गोमन्तक

आंध्र प्रदेशात शनिवारी एव्हिएशन अकादमीचे (Aviation Academy) विमान कोसळले. या विमान अपघातात प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृत्यू झाला. महिमा असे वैमानिकाचे नाव असून ती तामिळनाडूची होती. आंध्रमधील नालगोंडा येथे ही दुर्घटना घडली. तामिळनाडूच्या गुंजूर जिल्ह्यातील माचेर्ला येथून विमानाने उड्डाण केले. विमान उड्डाण घेत असताना विजेच्या खांबाला धडकले, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विमान आणि वैमानिक जमिनीवर कोसळले. (Aviation Academy plane crash)

ग्वाल्हेरमध्येही विमान कोसळले

यापूर्वी, कोरोना काळात 6 मे 2021 रोजी, मध्य प्रदेश सरकारचे राज्य विमान अहमदाबादहून ग्वाल्हेरला रेमडेसिव्हिर इंजेक्शन घेऊन येत होते. ग्वाल्हेर विमानतळावर उतरत असताना विमान कोसळले आणि विमानाला क्रॅश लँडिंग करावे लागले. या अपघातात विमान उडवणारे कॅप्टन सईद माजिद अख्तर आणि त्यांचे सहकारी वैमानिक शिवशंकर जयस्वाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर विमान पूर्णपणे निस्तनाभूत झाले होते.

विमान अपघातामुळे राज्य सरकारचे 85 कोटींचे नुकसान झाल्याचा दावा मध्य प्रदेश सरकारने केला होता.राज्य सरकारच्या वतीने आरोपपत्र कॅप्टन माजिद अख्तर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. अपघातामुळे 60 कोटी रुपये किमतीचे विमान भंगारात रूपांतरित झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारला इतर खासगी ऑपरेटरकडून विमाने भाड्याने घ्यावी लागली. यासाठी शासनाकडून 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT