देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. याच पाश्वभूमीवर डीडीएमएच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Corona Restrictions Will Come To An End In Delhi From Monday With Night Curfew)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून दिल्लीत (Delhi) रात्रीच्या कर्फ्यूसह (Night Curfew) सर्व निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळांमध्ये हाय-ब्रिज पद्धतीने वर्ग सुरु राहतील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिल्यास एप्रिलमध्ये शाळा पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने सुरु होतील. त्याच वेळी, मास्कवरील दंड देखील कमी करण्यात आला आहे. दिल्लीत, मास्कशिवाय दंड 2000 वरुन 500 वर आला आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी डीडीएमए बैठकीत सांगितले की, आता कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे दिल्लीला पुन्हा एकदा सामान्य स्थितीत आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत.
तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन माहिती दिली की, परिस्थिती सुधारत असल्याचे पाहून DDMA ने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. 1 एप्रिलपासून शाळा पूर्णपणे ऑफलाइन होतील. मास्क न घातल्याबद्दल दंडाची रक्कम 500 रुपये करण्यात आली आहे. परंतु प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
शिवाय, दिल्ली सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत 556 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, संसर्ग दर 1.10 टक्के नोंदवला गेला आहे. यादरम्यान 6 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी, गेल्या 24 तासांत 618 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ही दिलासादायक बाब आहे. यापूर्वी बुधवार 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीत कोरोनाचे 583 नवीन रुग्ण आढळले होते, 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
2276 सक्रिय केस
आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत दिल्लीत 50591 लोकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 556 जणांना लागण झाल्याचे आढळून आले असून 618 रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी, नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2344 वरुन 2276 वर आली आहे. त्यापैकी 1559 लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 158 आहे, त्यापैकी 72 आयसीयूवर, 69 ऑक्सिजन सपोर्टवर आणि 16 व्हेंटिलेटरवर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.