ATS Dainik Gomantak
देश

ATS Raids: गुजरात निवडणुकीपूर्वी एटीएसचे 13 जिल्ह्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी छापे

Gujrat Election: गुजरात निवडणुकीपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई होताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरात निवडणुकीच्या दरम्यान दहशतवादविरोधी पथकाची (ATS) मोठी कारवाई होत आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी एटीएसचे छापे सुरू आहेत. काल रात्रीपासून छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएस जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई करत असून सुरत, अहमदाबाद, जामनगर, भरूच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 150 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या (Money) व्यवहारांबाबत आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.

  • कोट्यवधी रुपयांची जीएसटी चोरी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद अजमल शेख आणि शहजाद नावाची व्यक्ती एटीएसच्या रडारवर होती. त्याच्यावर अनेक दिवसांपासून एटीएसची नजर होती. एटीएसने या दोघांना शुक्रवारी रात्री प्रथम अटक केली.

साजिद आणि शहजाद राज्यभरात जीएसटी चोरीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची जीएसटी (GST) चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांचे तार पीएफआय (PFI) आणि हवाला रॅकेटशी संबंधित असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT