Atique Ahmed Dainik Gomantak
देश

Atique Ahmed Disclosure: मरण्यापूर्वी अतिकने केला 'या' 14 नावांचा मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डॉनसह...!

Atique Ahmed Murder Case: मरण्यापूर्वी माफिया अतिकने 14 नावांचा खुलासा केला होता. त्यात मेरठचा माफिया बदनसिंग बद्दो याचेही नाव आहे.

Manish Jadhav

Atique and Ashraf Ahmed Murder: माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची शनिवारी प्रयागराजमध्ये पोलिसांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मात्र, मरण्यापूर्वी माफिया अतिकने 14 नावांचा खुलासा केला होता. त्यात मेरठचा माफिया बदनसिंग बद्दो याचेही नाव आहे.

यासोबतच, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह त्याच्या लखनऊच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे, ज्याने ही रक्कम दिली होती. पाकिस्तानातून (Pakistan) राजस्थानमार्गे शस्त्रे पोहोचवणाऱ्या व्यक्तीचे नावही अतिकने सांगितले. तो राजस्थानचा रहिवासी आहे.

यूपी एसटीएफ आणि एटीएसने त्यांचा तपास तीव्र केला आहे. अनेक मोठी नावे समोर येऊ शकतात, काही व्हाईट कॉलरचाही यात समावेश आहे.

माफिया अतिक अहमद आणि अश्रफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

माफिया डॉन अतिक अहमद आणि अश्रफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यात तीन आरोपींशिवाय आणखी दोन सूत्रधारांचा समावेश आहे.

पोलिसांना (Police) महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. एफआयआर नोंदवल्यानंतर त्यांचा शोध सुरु आहे. दोन अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. पोलीस आणि यूपी एसटीएफ गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

रॅपिड फायरिंगमध्ये अतीक-अश्रफ यांचा मृत्यू झाला

विशेष म्हणजे, काल रात्री प्रयागराजमधील रुग्णालयाबाहेर जोरदार गोळीबार झाला. गोळीबारात अतिक आणि अश्रफ यांचा मृत्यू झाला. हत्येतील आरोपी लवलेशच्या वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे. त्याचा माझ्या मुलाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, प्रयागराजच्या एसआरएन हॉस्पिटलमध्ये कडेकोट बंदोबस्तात अतिक आणि अश्रफ यांचे पोस्टमॉर्टम सुरु आहे. दफनासाठी दोन कबरी खोदल्या जात आहेत.

गुड्डू मुस्लिमला अटक

उमेश पाल खून प्रकरणातील 5 लाखांचे इनाम असलेला फरार आरोपी गुड्डू मुस्लिम याला अटक करण्यात आली आहे. यूपी एसटीएफने त्याला नाशिकमधून पकडले आहे.

दरम्यान, अतिक-अश्रफ हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी यांची बैठक संपली आहे. ही उच्चस्तरीय बैठक सुमारे 4 तास चालली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत डीजीपी विश्वकर्माही सहभागी झाले होते. डीजीपी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. अतिकची पत्नी शाइस्ता परवीन आज आत्मसमर्पण करु शकते, अशा बातम्याही येत आहेत. उमेश खून प्रकरणानंतर शाइस्ता फरार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT