Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

बारामुल्लात दहशतवाद्यांनी सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांनी गावातील प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लातील एका गावातील सरपंचाची शुक्रवारी हल्ल्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. काश्मीरमध्ये गेल्या सहा आठवड्यांतील पंचायत सदस्याच्या हत्येची ही चौथी घटना आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले परंतु रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केले. अहमद बांगरु असे मृत सरपंचाचे नाव आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पंचायत सदस्य दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य बनले आहेत. खोऱ्यात स्थलांतरित कामगार आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांवरही हल्ले झाले आहेत.

गुरुवारी, पोलिसांनी सांगितले की, अलीकडेच दहशतवादी संघटनेत सामील झालेले चार स्थानिक दहशतवादी शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी स्थलांतरित मजुरांवर अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यात सहभागी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी स्थलांतरित मजुरांवर अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. हे चौघेही गेल्या महिनाभरापासून बेपत्ता होते. ते लष्कर ए तोयबामध्ये सामील झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यापैकी एकाने गार्डकडून 12 बोअरची रायफल हिसकावून घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT