assembly election result 2022 live up punjab uttarakhand manipur goa vote counting news updates today | Assembly election results 2022 updates Dainik Gomantak
देश

यूपी-उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजप; गोवा आणि मणिपूरात बहुमताच्या दिशेने

पंजाबमध्ये 'आप' आघाडीवर

Shubham Tate

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यूपीमध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. निकालानुसार भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. उत्तराखंडमध्येही भाजपचे पुनरागमन होताना दिसत आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. (Assembly election results 2022 updates)

दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरस आहे. गोव्यातील विधानसभेच्या (Assembly) 40 जागांचा कल पाहिला तर भाजपला 19 तर काँग्रेसला 12 जागा मिळत आहेत. गोव्यात टीएमसी 3 जिंकताना दिसत आहे तर AAP 2 आणि इतरांना 4 जागी विजय मिळाला आहे.

दरम्यान, उत्तराखंडमधून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हरीश रावत यांना उत्तराखंडच्या लालकुआन मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हरीश रावत हे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. हरीश रावत यांचा 13893 मतांनी पराभव झाला आहे.

आज विधानसभा निवडणुकीच्या 23 दिवसांनंतर उत्तराखंडमधील (Uttarakhand) सर्व 70 विधानसभा जागांवर निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत आणि लवकरच फायनल निकालही पाहायला मिळणार आहे. ज्या प्रकारे निकाल समोर येत आहेत, त्यावरून राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT