Assam Dainik Gomantak
देश

Assam: रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, चौघांना अटक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिले सक्त कारवाईचे आदेश

Pramod Yadav

विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी चार सिनिअर विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. आसाममधील दिब्रुगड विद्यापीठाच्या वसतिगृहात रविवारी ही घटना घडली.

(Assam youth jumps off hostel building to escape ragging; 4 held)

आनंद शर्मा असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

मुलांनी रॅगिंग केल्यामुळे, मानसिक आणि शारीरिक छळ करून, त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, पैसे लुटले आणि त्याचा मोबाइलही हिसकावला. असे आनंद शर्माच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही या घटनेवर वक्तव्य केले आहे. 'रॅगिंगच्या कथित प्रकरणात दिब्रुगड विद्यापीठातील विद्यार्थ्याला दुखापत झाल्याचे कळते. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यात आली आहे. पीडितेला वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे.' असे ट्विट आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. या घटनेत साथ देणाऱ्या इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती दिब्रुगडचे एसपींनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT