Meena Deshmukh Accident News: फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळल्यानं जेष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख (Meena Deshmukh) यांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूरजवळ रविवारी रात्री ही घडली. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना रविवारी रात्री एक फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली. यात लावणी कलावंत मीना देशमुख यांच्यासह त्यांची कन्या, नात आणि चालक होते. या अपघातात मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, त्यांची कन्या, नात आणि चालक जखमी झाले आहेत. गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यानं कार या खोल कालव्यात पडल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.