Assam Flood  Dainik Gomantak
देश

Assam Flood मध्ये, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू, केंद्र सरकारनकडून 324 कोटींची मदत जाहीर

आसाममध्ये पुरामुळे आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 30 झाली आहे.

दैनिक गोमन्तक

आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंभीर आहे. पुरामुळे एका मुलासह आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे . राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये 5.61 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी एसडीआरएफ (स्टेट डिझायनर रिस्पॉन्स फोर्स) कडून 324 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी करण्यात आली आहे. (assam flood death 30 central govt released advance rs 324 crores news)

ही माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, 'आसामच्या सध्याच्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी एसडीआरएफ कडून 324 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी करण्यात आली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्र्यांचा आभारी आहे.'

* मृतांचा आकडा 30 वर पोहोचला

आसाम (Assam) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनंदिन अहवालानुसार, गुरुवारी कामरूप आणि नौगावच्या राहा येथे एकाचा मृत्यू झाला. राज्यात यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 30 झाली आहे. प्राधिकरणाने सांगितले की, कचार, दिमा हासाओ, हैलीकांडी, होजाई, कार्बी आंगलाँग, पश्चिम मोरीगाव आणि नौगाव जिल्ह्यांमध्ये 5,61,100 हून अधिक लोक पुरामुळे अडचणीत आले आहेत

नागाव जिल्हा सर्वाधिक फटका बसला

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) गुरुवारी सांगितले , 66,836 पूरग्रस्त पाच जिल्ह्यांमध्ये आश्रय घेत आहेत. आसाममधील पुराचा सर्वाधिक फटका नागावला बसला आहे, जिथे 3.68 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याच वेळी, कचर जिल्ह्यातील सुमारे 1.5 लाख लोक आणि मोरीगावमधील 41,000 हून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. दिमा हासाओ मार्गे दक्षिण आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरामसाठी रेल्वे सेवा ईशान्य सीमा रेल्वेच्या लुमडिंग-बदरपूर विभागात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे अद्यापही स्थगित आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT