CM Himanta Biswa Sarma Dainik Gomantak
देश

PFI वर तात्काळ बंदी घाला: मुख्यमंत्री सरमा

दैनिक गोमन्तक

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी केंद्र सरकारला (Central Government) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर पूर्णपणे बंदी घालण्याचे आवाहन केले. ते शनिवारी म्हणाले की, "आसामने हिजाबच्या मुद्द्यामुळे नव्हे तर पीएफआयवर तात्काळ संपूर्ण बंदी घालण्याची विनंती केंद्र सरकारला केली. हा त्यांचा लोकशाही अधिकार आहे, परंतु विध्वंसक कारवायांमध्ये आणि कट्टरतावादात त्यांचा थेट सहभाग असल्यामुळे, त्याच वेळी, ते म्हणाले की आसाम सरकार काही अमली प्रकरणे एनसीबीकडे सोपवत आहे जेणेकरून ते पुढील आणि मागील तारांचा शोध घेऊ शकेल. पाच वर्षांनंतर आसाम आदर्श होईल, अशी आशा आहे. (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma has called on the Center to impose a complete ban on PFI)

सीएम हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, हिजाबच्या वादावरुन कोणताही वाद होऊ नये, कुराण शरीफ हिजाबवर नव्हे तर शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. ते म्हणाले की, शिक्षण आणि हिजाब यांना समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. मुस्लिमांची सर्वात मोठी जबाबदारी ही शिक्षणाची असते. कर्नाटकमध्ये (Karnataka) हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आसामच्या (Assam) मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आसामचे मुख्यमंत्री दररोज हेडलाईन्समध्ये झळकत असतात. राज्याची संस्कृती, परंपरा आणि सभ्यता प्रतिबिंबित करणाऱ्या ठिकाणांची नावे बदलण्यासाठी त्यांचे सरकार जनतेकडून सूचना मागवणार असल्याचे त्यांनी यापूर्वीही सांगितले आहे. सरमा म्हणाले होते की, नावात बरंच काही असतं. एखाद्या शहराचे, किंवा गावाचे नाव तिची संस्कृती, परंपरा आणि सभ्यता दर्शवत असते. संपूर्ण आसाममध्ये नाव बदलाबाबत सूचना मागवण्यासाठी आम्ही एक पोर्टल सुरू करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT