Asia Cup Controversy Dainik Gomantak
देश

Asia Cup Controversy: पाकडे रडतच बसणार... "कप देतो, पण माझ्याकडूनच घ्यावा लागेल" नक्वींचा बालहट्ट काय

Asia Cup 2025: जिंकलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी स्वीकारण्यास तुमचे ‘स्वागत’ आहे, परंतु ती तुम्हाला आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात माझ्याकडून घ्यावी लागेल.

Sameer Amunekar

जिंकलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी स्वीकारण्यास तुमचे ‘स्वागत’ आहे, परंतु ती तुम्हाला आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात माझ्याकडून घ्यावी लागेल, असा हेका पाकिस्तानचे गृहमंत्री असलेल्या आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेल्या मोहसिन नक्वी यांनी कायम ठेवला आहे.

दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून भारतीय संघाने आशिया करंडक विजेतेपद मिळवले. त्यानंतर तीन दिवस झाले तरी भारतीय संघाला विजेतेपदाचा करंडक मिळालेला नाही. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हस्ते करंडक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नक्वी यांनी करंडकासह पळ काढला आणि आपला बालहट्ट अजून कायम ठेवला आहे.

मंगळवारी आशिया क्रिकेट परिषदेची बैठक झाली. त्यात नक्वी यांनी भारताची माफी मागितली, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मी भारतीय पदाधिकाऱ्यांची माफी मागितलेली नाही, असा खुलासा त्यांनी एक्सवरून केला आहे.

आशिया क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी विजेतेपदाचा करंडक भारताला देण्यास तयार होतो आणि अजूनही तयार आहे. त्यासाठी भारतीयांचे स्वागतच आहे, परंतु त्यांनी परिषदेच्या कार्यालयात माझ्याकडून करंडक स्वीकारावा, असे नक्वी यांनी एक्सवर म्हटले आहे. मी कोणतेही चुकीचे वर्तन केले नाही, तसेच भारतीयांसमोर दिलगिरीही व्यक्त केली नाही, असाही उल्लेख त्यांनी केला आहे.

मंगळवारी झालेल्या आशिया परिषदेच्या बैठकीत भारताकडून आशीष शेलार आणि राजीव शुक्ला ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. विजेतेपद मिळवूनही करंडक न दिल्याबद्दल या दोघांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि आक्षेपही घेतला होता. या बैठकीत करंडक देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, असे नक्वी म्हणतात.

नोव्हेंबर महिन्यात आयसीसीची बैठक होत आहे, त्यात नक्वी यांच्या या कृतीवर बीसीसीआय आवाज उठवणार आहे आणि नक्वी यांच्या हकालपट्टीचीही मागणी करणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

Horoscope:भाग्याचा तारा चमकणार! 'या' राशींना मिळणार सुखाची बातमी, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT