Wasim Akram Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Wasim Akram Reaction: आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल काही भारतीय चाहते अजूनही नाराज आहेत.

Manish Jadhav

Wasim Akram Reaction On India vs Pakistan Match: आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल काही भारतीय चाहते अजूनही नाराज आहेत. दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे भारतीय क्रिकेटर्सचेही असे मत आहे की, पाकिस्तानसोबत अजिबात खेळायला नको. पण तरीही आशिया कपमध्ये या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. आता याच महामुकाबल्याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि महान गोलंदाज वसीम अक्रमने एक मोठे आणि महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

भारत-पाक सामन्यावर काय म्हणाले वसीम अक्रम?

वसीम अक्रमने ‘स्टिक विथ क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना सांगितले की, “आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, पण आम्ही पाकिस्तानात शांत आहोत.”

पुढे ते म्हणाले की, “आम्ही खेळलो काय किंवा नाही खेळलो काय, काही फरक पडत नाही, पण खेळ सुरु राहिला पाहिजे.” अक्रमने भविष्यात भारत (India) आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका होण्याची आशाही व्यक्त केली.

आपले मत स्पष्ट करताना अक्रम म्हणाले की, “मी कोणत्याही राजकारणात पडत नाही. ते त्यांच्या देशाशी आणि आपण आपल्या देशाशी निष्ठावान आहोत. कोणीही मर्यादा सोडून जास्त बोलू नये. केवळ आपण आपल्या देशाच्या कामगिरीबद्दलच बोलले पाहिजे. ही गोष्ट भारत-पाकिस्तान दोघांनाही लागू होते, पण हे म्हणणे सोपे आहे. मात्र प्रत्यक्षात अमलात आणणे खूप कठीण आहे.”

एकच ग्रुपमध्ये दोन्ही संघ

दुसरीकडे, 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई सोबत खेळेल. आशिया कपसाठी टीम इंडियाला गट ‘अ’ मध्ये पाकिस्तान (Pakistan), ओमान आणि यूएई सोबत ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी 4 संघांच्या 2 गटांमध्ये विभागले आहे. स्पर्धेतील सामने दुबई आणि अबू धाबीमध्ये खेळले जातील. 11 सामने दुबईमध्ये तर 8 सामने अबू धाबीमध्ये होणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय (Bilateral) मालिका होत नाहीत. त्यामुळे हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. या कारणास्तव, जेव्हा केव्हा यांच्यात सामना होतो, तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर, ‘खेळ सुरुच राहिला पाहिजे’ हे वसीम अक्रमचे म्हणणे शांततेचा आणि खेळ भावनेचा संदेश देणारे आहे. पण राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या ठेवणे किती कठीण आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT