Asia Cup 2025: शुभमन गिल, अय्यरचे काय करायचे? निवड समितीसमोर प्रश्न; जयस्वालबाबतही करावा लागणार विचार

Asia Cup Indian Team: आशिया करंडकसाठी संघ निवड होत आहे. टी-२० प्रकारात फलंदाजीची रचना जवळपास निश्चित असताना त्यात प्रतिभावान शुभमन गिलला कसे स्थान द्यायचे यावर निवड समितीला खल करावा लागणार आहे.
Shreyas Iyer, Shubhman Gill
Shreyas Iyer, Shubhman GillDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: बहुचर्चित आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संघ निवड होत आहे. टी-२० प्रकारात फलंदाजीची रचना जवळपास निश्चित असताना त्यात प्रतिभावान शुभमन गिलला कसे स्थान द्यायचे यावर निवड समितीला खल करावा लागणार आहे. श्रेयस अय्यरबाबतही हाच प्रेचप्रसंग आहे.

आयपीएलमधील कामगिरीमुळे निवड समितीसमोर चांगले पर्याय मिळाले आहे. संघ निवड करताना आणि आशिया करंडक स्पर्धेनंतर लगेचच होत असलेल्या कसोटी मालिकेचाही विचार करून निवड समितीला १५ खेळाडू निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जयस्वालच्या निवडीबीबतही प्रश्नचिन्ह असेल.

इंग्लंडमध्ये अलीकडेच कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्याची कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलकडे व्हाइट बॉल क्रिकेटमधीलही भवितव्य म्हणून पाहिले जात आहे, पण १५ खेळाडूंत स्थान मिळवणे सध्या तरी त्याच्यासाठी सोपे नसल्याचे दिसून येत आहे.

Shreyas Iyer, Shubhman Gill
Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

भारतीय संघ या अगोदर इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळला होता त्यात यशस्वी कामगिरी केलेली असल्यामुळे त्या संघात बदल करायचे की त्या संघावर विश्वास ठेवायचा हासुद्धा विचार आगरकर यांच्या समितीला करावा लागणार आहे.

फलंदाजीत पहिल्या चार क्रमांकामध्ये अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे स्थान निश्चित आहे. याव्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल तर फॉर्मात आहेच आणि त्याची शैली टी-२० प्रकारास अधिक मिळती जुळती आहे. तसेच आयपीएलमधील ऑरेंजकॅप धारक साई सुदर्शन वेटिंगवर आहे अशा स्थितीत शुभमन गिलला कोणच्या ठिकाणी स्थान द्यायचे हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे कदाचित श्रेयस अय्यरलाही १५ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.

Shreyas Iyer, Shubhman Gill
Asia Cup: आशिया कपमध्ये धावांचा पाऊस पाडणारे खेळाडू; यादीत 3 भारतीय, जाणून घ्या नंबर वन?

संघ व्यवस्थापनातील एका वरिष्ठ सदस्याच्या मते, गेल्या हंगामात चांगली कामगिरी केलेल्या संघात आता केवळ एका मोठ्या नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यासाठी कोणावर अन्याय करणे योग्य ठरणार नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघाने गेल्या २० सामन्यांपैकी १७ सामने जिंकत ८५ टक्के यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यात गिल आणि जयस्वाल यांचा समावेश नव्हता, मात्र त्याआधी गिल आणि जयस्वाल टी २० आंतरराष्ट्रीय खेळले होते आणि दोघांचीच कामगिरी चांगली होती, शिवाय आयपीएलमध्येही त्यांनी प्रभावी खेळ केला होता. गिल हा सूर्यकुमारचा उपकर्णधार होता, पण कसोटी मालिकेमुळे त्याला टी-२० सामने खेळता आले नाहीत. त्यानंतर अक्षर पटेल उपकर्णधार बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com