आशिया खंडातील क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षेत ठेवणारा आशिया कप २०२५ ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये रंगणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ८ संघ टी-२० स्वरूपात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे हा आशिया कप ऐतिहासिक ठरणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून प्रत्येक संघ यशस्वी तयारीसाठी उत्सुक आहे.
या वर्षीच्या आशिया कपमध्ये दोन गट तयार करण्यात आले आहेत.
गट अ: भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान
गट ब: हाँगकाँग, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका
गटातून अव्वल दोन संघांना सुपर फोर फेरीमध्ये प्रवेश मिळेल. त्यानंतर सुपर फोरमधून शीर्ष दोन संघ २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ग्रँड फायनलमध्ये भिडतील.
भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होईल. त्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागून राहिलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला १४ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
भारताचा शेवटचा गट सामना १९ सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध होईल. यानंतर सुपर फोरची मालिका २० ते २६ सप्टेंबर दरम्यान रंगेल आणि विजेतेपदाचा लढा २८ सप्टेंबर रोजी पार पडेल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील.
क्रिकेट चाहत्यांसाठी या वर्षी प्रसारणात बदल करण्यात आला आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आशिया कप २०२५ चे अधिकार आहेत. त्यामुळे सामने टीव्हीवरील सोनी स्पोर्ट्स चॅनेल्सवर पाहता येतील.
टीव्ही प्रक्षेपण – सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
ऑनलाइन स्ट्रीमिंग – सोनीLIV (OTT)
याआधी अनेक वर्षे हा टूर्नामेंट स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळत होता. मात्र, यंदा संपूर्ण स्पर्धा केवळ सोनी स्पोर्ट्स आणि सोनीLIVवरच उपलब्ध असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.