दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून मात केली. या विजयानंतर भारतीय संघाने विक्रमी नवव्यांदा आशियाई विजेतेपद पटकावले असून, देशभरातून या कामगिरीचे कौतुक होत आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजांनी १४६ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत लक्ष्य सहज पार केले. भारताच्या विजयानंतर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात ढोल-ताशा वाजवत, फटाके फोडत आनंद व्यक्त केला. राजधानीच्या रस्त्यांवर ढोल-ताशांच्या तालावर लोक नाचू लागले. तरुणांनी आपल्या बाईकवर तिरंगा घेऊन विजयाचा उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी लोकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
एका चिमुकल्याने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, "पाकिस्तान को तो हमेशा हारना ही रहता है, जब देखो तब हारता है। अरे पाकिस्तान कुछ तो करके दिखा... थू।'” या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केवळ नागरिकच नव्हे तर सीआरपीएफ जवानांनीही हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला. सुकमा येथील ७४ बटालियन सीआरपीएफच्या जवानांनी तळावर जल्लोष केला. राष्ट्रीय ध्वज फडकावत आणि घोषणाबाजी करत सैनिकांनी हा क्षण अविस्मरणीय बनवला.
या विजयासह भारतीय संघाने विक्रमी नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. यामुळे भारतीय क्रिकेटचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. हा विजय केवळ खेळातील यश नाही, तर संपूर्ण देशाच्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.