Danish Kaneria Post Viral Dainik Gomantak
देश

'माँ तुझे सलाम...', फायनल सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाची पोस्ट चर्चेत, नेटिझन्स म्हणाले, "कल तेरी अम्मा हमारे..."

Danish Kaneria: आशिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत मात केली.

Sameer Amunekar

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी रात्री खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत मात केली. या रोमांचक सामन्यानंतर भारताने विक्रमी नवव्यांदा आशियाई विजेतेपद पटकावत पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात आपली बादशाही सिद्ध केली आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केलं. देशभरातून या विजयाचं प्रचंड कौतुक होत असून, चाहत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

मात्र या विजयाच्या आनंदात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कनेरियाने आपल्या सोशल मीडियावर पत्नीसमवेत नवरात्रीचे काही फोटो शेअर केले. त्या पोस्टसोबत त्याने "जय माता दी, नवरात्री वायब्स, माँ तुझे सलाम, जय अंबे" अशी कॅप्शन लिहिली. त्याची ही पोस्ट लगेचच भारतीय चाहत्यांच्या नजरेत भरली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली.

या पोस्टवर अनेकांनी कनेरियाचं कौतुक केलं असलं तरी काहींनी त्याच्यावर टीका केली. विशेष म्हणजे, भारतीय चाहत्यांनी सामन्यातील पाकिस्तानच्या पराभवाचा संदर्भ देत टोले लगावले. एका नेटिझनने लिहिलं – "कल तेरी अम्मा हमारे भारत देश से हार गई." तर आणखी एका चाहत्याने विचारलं – "पाकिस्तानातही पूजा होते का?" अशा कमेंट्समुळे पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव अपेक्षेप्रमाणे उभा राहू शकला नाही. चांगल्या सुरुवातीनंतरदेखील संपूर्ण संघ फक्त १९.१ षटकांत १४६ धावांवर गारद झाला.

विजयासाठी भारताला १४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी आत्मविश्वासपूर्ण खेळ करत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ विकेट्स राखत हे लक्ष्य पार केलं. भारतानं नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

जंतरमंतरवर सरकारविरोधात तरुणाई, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT