Asia Cup 2025 Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

Asia Cup 2025 predictions: २०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

Sameer Amunekar

२०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाचे यश मुख्यत्वे कर्णधार सूर्यकुमार यादव, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. मात्र माजी भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने केलेले भाकीत सध्या चर्चेत आहे.

कार्तिकचा ठाम विश्वास आहे की, भारतीय संघ पुन्हा एकदा आशिया कप जिंकेल. त्याच्या मते सध्याच्या संघाची ताकद इतकी प्रबळ आहे की विजयावर कुणालाही शंका नाही. तरीदेखील त्याने ३ अशा खेळाडूंची नावे घेतली आहेत, जे या स्पर्धेत ‘सुपरहिट’ ठरू शकतात.

कार्तिकच्या मते, कर्णधार सूर्या किंवा अभिषेक शर्मा नव्हे, तर उपकर्णधार शुभमन गिल सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून गिल प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरी भारताला मोठा फायदा करून देऊ शकते.

गोलंदाजीच्या बाबतीत कार्तिकचा विश्वास आहे की लेग-स्पिनर वरुण चक्रवर्ती यूएईच्या मैदानांवर पुन्हा एकदा कहर माजवू शकतो. २०२३ मधील दुबईतील चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने भारतासाठी सर्वाधिक ९ विकेट घेतल्या होत्या. त्याच धडाक्यात तो यंदा आशिया कपमध्येही प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळू शकतो.

तिसऱ्या खेळाडूविषयी बोलताना कार्तिकने यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्माचे नाव घेतले. आयपीएल २०२५ मध्ये त्याने आरसीबीसाठी अप्रतिम खेळी केली आणि सामने जिंकले. त्यामुळे जितेश या स्पर्धेत ‘गेम चेंजर’ ठरू शकतो आणि सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो.\

कार्तिकच्या या भाकितामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे. टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू जबाबदारी पार पाडेल अशी अपेक्षा आहे, परंतु गिल, चक्रवर्ती आणि जितेश शर्मा हेच खरेतर २०२५ च्या आशिया कपमध्ये ‘मॅच विनर’ ठरतील का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT